mr_tw/bible/names/caleb.md

3.7 KiB

कालेब

तथ्य:

कालेब हा मोशेने कनान देशाची पाहणी करण्याकरिता पाठवलेल्या बारा इस्राएली हेरांपैकी एक होता.

  • त्यांने आणि यहोशवाने लोकांना सांगितले की, कनानी लोकांना पराभूत करण्यासाठी देव आपल्याला मदत करेल ह्यावर लोकांनी विश्वास ठेवावा.
  • यहोशवा आणि कालेब हे त्यांच्या पिढीतील एकमेव पुरुष होते, ज्यांना कनान देशात प्रवेश करण्याची परवानगी मिळाली.
  • हेब्रोनची भूमी त्याला व त्याच्या कुटुंबाला मिळावी अशी कालेबाने विनंती केली. त्याला माहित होते की, तिथे राहणाऱ्या लोकांना पराभूत करण्यासाठी देव त्याला मदत करेल.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: हेब्रोन, यहोशवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 14:04 जेव्हा इस्राएल लोक कनान देशाच्या सीमेवर आले, तेव्हा मोशेने इस्राएलाच्या बारा वंशामधून प्रत्येकी एक अशा बारा मनुष्यांस निवडले. त्याने त्या मनुष्यांस कसे जावे व देश कसा हेरावा याविषयी सुचना देऊन तो देश कसा आहे हे बघायला सांगितले.
  • 14:06 लगेच कालेब आणि यहोशवा हे दोघे हेर म्हणाले, "कनानी लोक उंच व बलाढ्य आहेत ही गोष्ट खरी आहे, परंतु आपण त्यांचा निश्चितपणे पराभव करु शकतो. देव तुमच्या वतीने आज लढणार आहे!"
  • 14:08 फक्त यहोशवा आणि कालेब, यांना सोडून बाकी सर्व वीस वर्षाचे व वीस वर्षांवरील लोक या जंगलामध्येच मरतील व त्यांचा वचनदत्त देशामध्ये प्रवेश होणार नाही.”

जेणेकरून ते त्या देशात शांततेने राहू शकतील.

Strong's

  • Strong's: H3612, H3614