mr_tw/bible/other/astray.md

3.4 KiB

मोकाट, बहकणे, भरकटलेले, भलतीकडे नेणे, फसवणे, भटकणे, भटकलेले

व्याख्या:

"भटकणे" आणि "बहकणे" या शब्दांचा अर्थ देवाच्या इच्छेच्या आज्ञेचे उल्लंघन करणे असा होतो. जे लोक "भलतीकडे जात आहेत" त्यांनी इतर लोकांना किंवा परिस्थितीमुळे त्यांना देवाची अवज्ञा करण्यास प्रवृत्त केले आहे.

  • "मोकाट" शब्द चुकीच्या आणि धोकादायक मार्गावर जाण्यासाठी एक स्पष्ट मार्ग किंवा सुरक्षिततेचे स्थान सोडून जाण्याचे एक चित्र देतो.
  • मेंढरे जी आपल्या मेंढपाळाच्या कुरणाला सोडून जातात ती "भटकलेली" आहेत. परमेश्वर पापी लोकांची तुलना मेंढरांशी करतो, ज्यांनी परमेश्वराला सोडून दिले आणि "भरकटलेली" आहेत.

भाषांतर सूचना

  • "बहकणे" या वाक्यांशाचे भाषांतर "परमेश्वरापासून दूर जाणे" किंवा "परमेश्वराच्या इच्छेपासून दूर एक चुकीचा मार्ग निवडणे" किंवा "परमेश्वराची आज्ञा मानणे थांबवणे" किंवा "देवापासून दूर जाणाऱ्या मार्गाने जाणे" असे केले जाऊ शकते.
  • "भलतीकडे नेणे" याचे भाषांतर "एखाद्याला देवाची आज्ञा मोडण्यास कारणीभूत होणे" किंवा "देवावर विश्वास ठेवण्यापासून रोखण्यासाठी एखाद्यावर प्रभाव पाडणे" किंवा "एखाद्याला चुकीच्या मार्गावरुन नेण्यास निमित्त ठरणे." असेही केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: अवज्ञा, मेंढपाळ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H5080, H7683, H7686, H8582, G4105