mr_tw/bible/names/tarshish.md

2.5 KiB

तार्शिस

तथ्य:

जुन्या करारांमध्ये तार्शिस नावाचे दोन मनुष्य होते. हे एका शहराचे नाव देखील होते.

  • याफेथाच्या नातावांपैकी एकाचे नाव तार्शिस होते.
  • तार्शिस हे अहश्वेरोष राजाच्या एका सुज्ञ मनुष्याचे देखील नाव होते.
  • तार्शिस शहर हे खूप भरभराटीचे बंदर असलेले शहर होते, ज्याची जहाजे मौल्यवान वस्तू विकत घेण्यासाठी, विकण्यासाठी, किंवा व्यापारासाठी घेऊन जात होती.
  • हे शहर सोर शहराबरोबर संबंधित होते, आणि एक फुनिकी शहर आहे असे समजले जाते जे कदाचित स्पेनच्या दक्षिण किनाऱ्यावरील, कदाचित इस्राएल पासून थोड्या अंतरावर असेल.
  • जुन्या करारातील संदेष्टा योना, निनवेला उपदेश करायला जाण्याची देवाची आज्ञा पाळण्याऐवजी, तार्शिस शहरास जाणाऱ्या जहाजात चढला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: एस्तेर, याफेथ, योना, निनवे, फेनिके, सुज्ञ पुरुष)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H8659