mr_tw/bible/names/kidronvalley.md

2.7 KiB

किद्रोन खोरे

तथ्य:

किद्रोन खोरे हे एक खोल दरी आहे, जी यरुशलेम शहराच्या बाहेर, पूर्वेकडील भिंत आणि जैतुनाचा डोंगर ह्यांच्या मध्ये आहे.

  • हे खोरे सुमारे 1000 मीटर खोल आणि 32 किलोमीटर लांब आहे.
  • जेंव्हा दावीद राजा, त्याचा मुलगा अबशालोम ह्यापासून पळून गेला, तेंव्हा तो जैतुनाच्या डोंगरावर जाण्यासाठी, किद्रोन खोऱ्यामधून गेला.
  • यहुद्यांचा राजा योशीया आणि असा राजा ह्यांनी आज्ञा दिली की, खोट्या देवतांचे उच्च स्थाने आणि वेद्या ह्यांचा नाश करून त्या जाळून टाका आणि त्यांची राख किद्रोन खोऱ्यात नेऊन टाका.
  • हिज्कीया राजाच्या कारकिर्दीत, याजकांनी मंदिरामधून काढलेल्या सर्व अशुद्ध वस्तूंना किद्रोनच्या खोऱ्यात फ्हेकून देण्यात आले.
  • दुष्ट राणी अथल्या हिला, तिने केलेल्या वाईट कृत्यांमुळे किद्रोन खोऱ्यात मारण्यात आले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अबशालोम, असा, अथल्या, दावीद, खोटे देव, हिज्कीया, उच्च स्थाने, योशीया, यहूदा, जैतुनाचा डोंगर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H5674, H6939, G2748, G5493