mr_tw/bible/other/highplaces.md

3.6 KiB

उंच स्थान, उंचस्थळी

व्याख्या:

"उंचस्थळी" या शब्दाचा संदर्भ वेद्या आणि अशेरा देवीच्या स्तंभाशी आहे, ज्यांचा उपयोग मूर्तींची उपासना करण्यासाठी होतो. त्यांना सहसा उंच जागेवर बांधण्यात येत असे, जसे की टेकडीवर किंवा डोंगराच्या बाजूला.

  • इस्राएलाच्या अनेक राजांनी या उंच ठिकाणी खोट्या देवासाठी वेद्या बांधून देवाविरुद्ध पाप केले. ह्याने लोकांनी मुर्त्यांची उपासना करण्यामध्ये गंभीरपणे गुंतण्याकडे लोकांचे नेतृत्व केले.
  • जेंव्हा जेंव्हा इस्राएलावर आणि यहुदावर देवाला भिणाऱ्या राजांनी राज्य करण्यास सुरवात केली, तेंव्हा तेंव्हा त्यांनी या मुर्त्यांची उपासना करणे थांबवण्यासाठी त्यांची उंचस्थळे किंवा वेद्या काढून टाकल्या, हे वारंवार असेच घडले.
  • तथापि, चांगल्या राजांपैकी काहींनी जे निष्काळजी होते आणि त्यांनी ती उंचस्थळे काढून टाकली नाहीत, ह्याचा परिणाम संपूर्ण इस्राएल राष्ट्राने मूर्तींची उपासना करण्यास सुरवात केली.

भाषांतर सूचना:

  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतीमध्ये, "मूर्तींची उपासना करण्यासाठी उंच करण्यात आलेली ठिकाणे" किंवा "टेकडीवरील मूर्तीचे स्तंभ" किंवा "मूर्तीच्या वेदीचे उंचावटे" असे केले जाऊ शकते.
  • हे शब्द, जिथे वेदी ठेवलेली आहे त्या उंच स्थळांना फक्त संदर्भित न करता, मूर्तीच्या वेद्यांनासुद्धा संदर्भित करतील ह्याची खात्री करा.

(हे सुद्धा पहा: वेदी, खोटे देव, उपासना)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1116, H1181, H1354, H2073, H4791, H7311, H7413