mr_tw/bible/kt/righthand.md

6.5 KiB

उजवा हात

व्याख्या:

लाक्षणिक अभिव्यक्ती "उजवा हात" याचा संदर्भ सन्मानाची जागा किंवा उजव्या बाजूला असलेली शासकाची ताकद किंवा इतर महत्वाची व्यक्ती यांच्याशी आहे.

  • उजवा हात हा शक्ती, अधिकार, किंवा ताकदीचे चिन्ह म्हणून देखील वापरला जातो.
  • पवित्र शास्त्र येशूचे वर्णन देवपित्याच्या "उजव्या हाताला" विश्वासणाऱ्यांच्या शरीराचा (मंडळी) मुख्य म्हणून आणि सर्व सृष्टीचा शासक म्हणून नियंत्रण करण्यासाठी बसला आहे, असे करते.
  • एखाद्या व्यक्तीचा उजवा हात विशेष सन्मान दर्शविण्यासाठी वापरला जातो,जेंव्हा तो एखाद्याच्या डोक्यावर आशीर्वाद देण्यासठी ठेवला जातो. (जसे की कुलपिता याकोबाने योसेफाचा मुलगा एफ्राहीम याला आशीर्वादित केले)
  • एखाद्याची "त्याच्या उजव्या हाताला राहून देवा करणे" ह्याचा अर्थ असा व्यक्ती असणे ज्याची सेवा त्या व्यक्तीसाठी विशेषकरून उपयुक्त आणि महत्वाची असते.

भाषांतर सूचना

  • काहीवेळा "उजवा हात" ह्याचा संदर्भ अक्षरशः त्या व्यक्तीच्या उजव्या हाताशी असतो, जसे की रोमी अधिकाऱ्याने त्याची थट्टा करण्याकरिता त्याच्या हातामध्ये वेत दिला. एखाद्या भाषेमध्ये हातासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाचा उपयोग करून त्याला भाषांतरित केले पाहिजे.
  • लाक्षणिक वापराबद्दल, जर "उजवा हात" या अभिव्यक्तीच्या समान अर्थाचा शब्द लक्षित भाषेमध्ये नसेल, तर त्या भाषेमधील समान अर्थाच्या वेगळ्या अभिव्यक्तीचा विचार करा.
  • "च्या उजव्या हाताला" या अभिव्यक्तीचे भाषांतर "च्या उजव्या बाजूला" किंवा "सन्माननीय जागेच्या बाजूला" किंवा "ताकतीच्या स्थानावर" किंवा "मदत करण्यास तयर असलेला" असे केले जाऊ शकते.
  • "त्याच्या उजव्या हाताने" याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "अधिकारासाहित" किंवा "शक्तीचा वापर करणे" किंवा "त्याच्या अद्भुत ताकतीने" यांचा समावेश होतो.
  • "त्याचा उजवा हात आणि त्याच्या बलवान हाताने" या लाक्षणिक अभिव्यक्तीचा उपयोग दोन्ही पद्धतीनी देवाची ताकत आणि देवाचे सामर्थ्य यावर भर देण्यासाठी केला जातो. या अभिव्यक्तीचे भाषांतर करण्याचा एक मार्ग "त्याचे अद्भुत सामर्थ्य आणि अफाट शक्ती" असे केले जाऊ शकते. (पहा: समांतरवाद
  • "त्यांच्या उजव्या हातात खोटेपणा आहे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "त्यांच्या बद्दलची सर्वात सन्माननीय गोष्ट सुद्धा खोट्या द्वारे भ्रष्ट आहे" किंवा "त्यांचे सन्माननीय स्थान फसवणुकीने भाराष्ट आहे" किंवा "ते त्यांना शक्तिशाली बनवण्यासाठी खोटेपणाची मदत घेतात" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: आरोप, वाईट, सन्मान, पराक्रमी, शिक्षा, बंडखोर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3225, H3231, H3233, G1188