mr_tw/bible/other/mighty.md

5.0 KiB

शक्ती, पराक्रमी, शक्तीमान, जोराने (ताकदीने)

व्याख्या:

"पराक्रमी" आणि "शक्ती" या शब्दांचा संदर्भ महान सामर्थ्य किंवा ताकत असण्याशी आहे.

  • सहसा "शक्ती" हा शब्द "ताकद" या शब्दासाठी दुसरा शब्द आहे. जेंव्हा देवाबद्दल सांगतो, तेंव्हा त्याचा अर्थ "सामर्थ्य" असा होतो.
  • "पराक्रमी पुरुष" हा वाक्यांश सहसा युद्धात धैर्यवान व विजयी असणाऱ्या पुरुषांचा उल्लेख करतो. दाविदाच्या विश्वासू मनुष्यांचा गट, ज्याने त्याला संरक्षणासाठी आणि बचावासाठी मदत केली त्या सर्वांना "पराक्रमी पुरुष" म्हटले जाते.
  • देवालासुद्धा "पराक्रमी" म्हणून संबोधले जाते.
  • "पराक्रमी कृत्ये" या वाक्यांशाचा सहसा संदर्भ देव करणाऱ्या अद्भुत गोष्टींशी आहे, विशेषकरून चमत्कार.
  • हे पद "सर्वशक्तिमान" या शब्दाशी संबंधित आहे, जे देवाचे सामान्य वर्णन आहे, त्याचा अर्थ त्याला संपूर्ण अधिकार आहे.

भाषांतर सूचना

  • संदर्भाच्या आधारावर, "पराक्रमी" या शब्दाचे भाषांतर "ताकदवान" किंवा "अद्भुत" किंवा "खूप शक्तिशाली" असे केले जाऊ शकते.
  • "त्याची शक्ती" या वाक्यांशाचे भाषांतर "त्याची ताकद" किंवा "त्याचे बल" असे केले जाऊ शकते.
  • प्रेषितांची कृत्ये 7 व्य अध्यायात, मोशेचे वर्णन असा मनुष्य जो "भाषणात आणि कृतीत पराक्रमी होता" असे केले आहे. ह्याचे भाषांतर "मोशे देवापासून घेऊन प्रभावी शब्द बोलला आणि त्याने विलक्षण गोष्टी केल्या" किंवा "मोशे देवाचे वचन ताकदीने बोलला आणि त्याने अनेक अद्भुत गोष्टी केल्या" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भावर आधारित, "पराक्रमी कृत्ये" ह्याचे भाषांतर "देवाने केलेली अद्भुत कृत्ये" किंवा "चमत्कार" किंवा "देव ताकदीने गोष्टी करतो" असे केले जाऊ शकते.
  • "शक्ती" या शब्दाचे भाषांतर कदाचित "ताकद" किंवा "महान सामर्थ्य" असे केले जाऊ शकते.
  • या शब्दाचा शक्यता व्यक्त करणाऱ्या इंग्रजी शब्दाबरोबर घोटाळा करू नका, जसे की, "कदाचित पाऊस पडेल."

(हे सुद्धा पहा: सर्वशक्तिमान, चमत्कार, शक्ती, सामर्थ्य)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H46, H47, H117, H193, H202, H352, H386, H410, H430, H533, H650, H1219, H1368, H1369, H1370, H1396, H1397, H1401, H1419, H2220, H2389, H2394, H2428, H3201, H3524, H3581, H3966, H4101, H5794, H5797, H5807, H5868, H6099, H6105, H6108, H6184, H6697, H6743, H7227, H7580, H7989, H8623, H8624, H8632, G972, G1411, G1413, G1414, G1415, G1498, G1752, G1754, G2159, G2478, G2479, G2900, G2904, G3168, G3173, G5082