3.0 KiB
3.0 KiB
फिलिप्पै, फिलिप्पैकर
तथ्य:
फिलिप्पै हे प्राचीन ग्रीसच्या उत्तरेकडील मासेदोनियामध्ये स्थित एक प्रमुख शहर आणि रोमी वसाहत होते. फिलिप्पै लोकांना फिलिप्पैकर असे म्हणत असे.
- पौल आणि सीला ह्यांनी फिलिप्पै येथील लोकांना येशुबद्दलची सुवार्ता सांगण्यासाठी या शहरास प्रवास केला.
- फिलिप्पैमध्ये असताना, पौल आणि सीला ह्यांना अटक झाली, पण देवाने त्यांना अद्भूतरीत्या बाहेर काढले.
- नवीन करारातील पुस्तक फिलिप्पैकरांस हे एक पत्र आहे, जे प्रेषित पौलाने फिलिप्पै येथील मंडळीतील ख्रिस्ती लोकांना लिहिलेले आहे.
- लक्षात घ्या की हे कैसरीया फिलिप्पैपासून वेगळे शहर आहे जे ईशान्य इस्राएलमध्ये हर्मोन पर्वताजवळ होते.
(हे देखील पाहा: कैसरीया, ख्रिस्ती, मंडळी, मासेदोनिया. पौल, सीला)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
- 47:1 एके दिवशी पौल आणि त्याचा मित्र सीला हे फिलिप्पै नगरामध्ये येशूची सुवार्ता सांगण्यासाठी गेले.
- __47:13__दुस-या दिवशी शहराच्या अधिका-यांनी पौल व सिला यांची सुटका केली व फिलिप्पै शहर सोडून त्यांना जाण्यास सांगितले.
शब्द माहीती:
- स्ट्रोंग: G5374, G5375