mr_tw/bible/names/philippi.md

29 lines
3.0 KiB
Markdown

# फिलिप्पै, फिलिप्पैकर
## तथ्य:
फिलिप्पै हे प्राचीन ग्रीसच्या उत्तरेकडील मासेदोनियामध्ये स्थित एक प्रमुख शहर आणि रोमी वसाहत होते. फिलिप्पै लोकांना फिलिप्पैकर असे म्हणत असे.
* पौल आणि सीला ह्यांनी फिलिप्पै येथील लोकांना येशुबद्दलची सुवार्ता सांगण्यासाठी या शहरास प्रवास केला.
* फिलिप्पैमध्ये असताना, पौल आणि सीला ह्यांना अटक झाली, पण देवाने त्यांना अद्भूतरीत्या बाहेर काढले.
* नवीन करारातील पुस्तक फिलिप्पैकरांस हे एक पत्र आहे, जे प्रेषित पौलाने फिलिप्पै येथील मंडळीतील ख्रिस्ती लोकांना लिहिलेले आहे.
* लक्षात घ्या की हे कैसरीया फिलिप्पैपासून वेगळे शहर आहे जे ईशान्य इस्राएलमध्ये हर्मोन पर्वताजवळ होते.
(हे देखील पाहा: [कैसरीया](../names/caesarea.md), [ख्रिस्ती](../kt/christian.md), [मंडळी](../kt/church.md), [मासेदोनिया](../names/macedonia.md). [पौल](../names/paul.md), [सीला](../names/silas.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 2:1-2](rc://*/tn/help/1th/02/01)
* [प्रेषितांची कृत्ये 16:11](rc://*/tn/help/act/16/11)
* [मत्तय 16:13-16](rc://*/tn/help/mat/16/13)
* [फिलीप्पेकरांस पत्र 1:1](rc://*/tn/help/php/01/01)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[47:1](rc://*/tn/help/obs/47/01)__ एके दिवशी पौल आणि त्याचा मित्र सीला हे __फिलिप्पै__ नगरामध्ये येशूची सुवार्ता सांगण्यासाठी गेले.
* __[47:13](rc://*/tn/help/obs/47/13)__दुस-या दिवशी शहराच्या अधिका-यांनी पौल व सिला यांची सुटका केली व __फिलिप्पै__ शहर सोडून त्यांना जाण्यास सांगितले.
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: G5374, G5375