mr_tw/bible/names/josephot.md

4.8 KiB

योसेफ (जुना करार)

तथ्य:

योसेफ हा याकोबाचा अकरावा मुलगा होता. तो राहेलचा पहिला मुलगा होता. त्याचे दोन पुत्र एफ्राईम आणि मनश्शे यांचे वंशज इस्त्राएलच्या दोन वंशांतून झाले.

  • योसेफ हे हिब्रू नाव “जोडणे, वाढवणे” आणि “एकत्र करणे, काढून घेणे” या हिब्रू शब्दा सारखे आहे.
  • उत्पत्तीच्या पुस्तकाचा एक मोठा भाग योसेफच्या कथेला समर्पित आहे, तो त्याच्या अनेक अडचणीं दरम्यान देवाशी कसा विश्वासू राहिला आणि त्याच्या भावांना क्षमा केली ज्यांनी त्याला मिसरमध्ये गुलाम म्हणून विकले होते.
  • अखेरीस देवाने योसेफला मिसर मधील दुसऱ्या सर्वोच्च स्थानावर उभे केले आणि मिसरच्या आणि आसपासच्या राष्ट्रांच्या लोकांना वाचवण्यासाठी त्याचा वापर केला जेव्हा अन्न कमी होते. योसेफने स्वतःच्या कुटुंबाला उपासमार होण्या पासून वाचवण्यास मदत केली आणि त्यांना मिसरमध्ये आपल्या सोबत राहायला आणले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)

(हे सुद्धा पाहा: इस्राएलच्या बारा जमाती, एफ्राईम, मनश्शे, याकोब, राहेल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 8:2 योसेफचे भाऊ त्याचा तिरस्कार करतात कारण त्यांचे वडील त्याच्यावर सर्वात जास्त प्रेम करतात आणि योसेफने स्वप्न पाहिले होते की तो त्यांचा शासक होईल.
  • 8:4 त्या गुलाम व्यापार्‍यांनी योसेफला मिसरला नेले.
  • 8:5 तुरुंगामध्ये देखिल, योसेफ देवाशी विश्वासू राहिला, आणि देवाने त्यास आशीर्वाद दिला.
  • 8:7 देवाने योसेफाला स्वप्नांचा अर्थ सांगण्याची क्षमता दिली होती, म्हणून फारोने योसेफास तुरूंगातून आपल्या घरी आणले.
  • 8:9 __योसेफ__ने लोकांना सात वर्षांच्या चांगल्या पिकाच्या काळात मोठ्या प्रमाणात अन्न साठवण्यास सांगितले.
  • 9:2 मिसरी लोकांना यापुढे योसेफ आणि त्याने त्यांना मदत करण्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींची आठवण ठेवली नाही.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच3084, एच3130, जी25000, जी25010