mr_tw/bible/names/colossae.md

2.6 KiB

कलस्सै, कलस्सैकर

तथ्य:

नवीन कराराच्या काळात, कलस्सै हे शहर रोमी प्रांताच्या फ्रुगीया या भागात होते, जो आताचा तुर्की देश आहे, त्याचा दक्षिणपश्चिमी भाग. कलस्सैकर हे कलस्सैमध्ये राहणारे लोक होते.

  • भूमध्य समुद्रापासून सुमारे 100 मैल अंतरावर स्थित, कलस्सै हे इफिस शहर आणि फरात नदी दरम्यानच्या महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर होते.
  • रोममधील तुरुंगात असताना, पौलाने कलस्सै येथील विश्वासणाऱ्यांमधील खोट्या शिकवणी सुधारण्यासाठी “कलस्सैकरांना” पत्र लिहिले.
  • जेंव्हा पौलाने हे पत्र लिहिले, तेंव्हा त्याने कलस्सै येथील मंडळीला भेट दिलेली नव्हती, पण त्याने तेथील विश्वासणाऱ्यांबद्दल, त्याचा सहकारी, एपफ्रास ह्याच्याकडून ऐकले होते.
  • एपफ्रास हा कदाचित ख्रिस्ती कामकरी होता, ज्याने कलस्सै येथे मंडळीची सुरुवात केली होती.
  • फिलेमोनाला पत्र, हे पौलाने कलस्सै येथील गुलामाच्या मालकाला उद्देशून लिहिलेले पत्र होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पाहा: इफिस, पौल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: G28570