mr_tw/bible/names/ephesus.md

2.4 KiB

इफिस, इफिसकर

तथ्य:

सध्याच्या तुर्की देशातील पश्चिमी किनारपट्टीवर स्थित इफिस हे एक प्राचीन ग्रीक शहर होते.

  • सुरुवातीच्या ख्रिस्ती लोकांच्या काळात, इफिस हे शहर आशियाची राजधानी होती, जो त्या काळी एक छोटा रोमी प्रांत होता.
  • त्याच्या स्थानामुळे, हे शहर व्यापाराचे आणि प्रवासाचे एक महत्वाचे केंद्र होते.
  • अर्तमी (डायना) देवीच्या उपासनेचे प्रसिद्ध मूर्तिपूजक मंदिर इफिसमध्ये स्थित होते.
  • पौल इफिसमध्ये दोन वर्षांपेक्षा जास्त काळ राहिला आणि त्याने तेथे काम केले आणि नंतर त्याने नवीन विश्वासणाऱ्यांचे नेतृत्व करण्याकरिता तीमथ्याला नियुक्त केले.
  • नवीन करारातील इफिसकरांस पत्र, हे पौलाने इफिस मधील ख्रिस्ती लोकांना लिहिलेले पत्र आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)

(हे देखील पाहा: आशिया, पौल, तिमथ्थी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: G21790, G21800, G21810