mr_tw/bible/kt/yahwehofhosts.md

4.4 KiB

सेनाधीश यहोवा, सेनाधीश देव, स्वर्गातील यजमान, स्वर्गाचा अधिकारी, सैन्यांचा देव

व्याख्या:

"सेनाधीश यहोवा" आणि "सेनाधीश देव" हे शब्द शीर्षक आहेत, जे देवाची आज्ञा पाळणाऱ्या हजारो देवदुतांवर त्याचा अधिकार व्यक्त करतात.

  • "सेना" आणि "सैन्य" हे शब्द कशाच्यातरी मोठ्या संख्येला संदर्भित करतात, जसे की लोकांचे सैन्य किंवा ताऱ्यांची प्रचंड संख्या. हे सर्व आत्मिक अस्तित्वांना देखील संदर्भित करू शकतात, ज्यामध्ये दुष्ट आत्म्यांचा समावेश होतो. मजकूर स्पष्ट करतो की, हे कशाला संदर्भित करते.
  • "आकाशातील नक्षत्रे" यासारखे वाक्यांश सर्व तारे, ग्रह, आणि आकाशातील इतर शरीरे ह्यांना संदर्भित करतात.
  • नवीन करारामध्ये, सैन्यांचा देव" या वाक्यांशाचा अर्थ "सेनाधीश यहोवा" ह्याच्या अर्थासारखाच आहे, परंतु त्याला त्याच मार्गाने भाषांतरीत केले जाऊ शकत नाही, कारण इब्री शब्द "यहोवा" ह्याचा उपयोग नवीन करारामध्ये केलेला नाही.

भाषांतर सूचना

  • "सेनाधीश याहोवा" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "यहोवा, जो सर्व देवदुतांवर सत्ता गाजवतो" किंवा "यहोवा, देवदूतांच्या सैन्याचा शासक" किंवा "यहोवा, सर्व निर्मितीचा अधिकारी" ह्यांचा समावेश केला जाऊ शकतो.
  • "सेनाधीश देव" किंवा "सैन्यांचा प्रभु" या शब्दांमधील "चे सैन्य" या वाक्यांशाचे भाषांतर वर केलेल्या "सेनाधीश यहोवा" या वाक्यांशाप्रमाणेच केले जाऊ शकते.
  • काही मंडळ्या "यहोवा" या शब्दाचा शब्दशः स्वीकार करीत नाहीत, त्याऐवजी, त्या अनेक पवित्र शास्त्राच्या आवृत्यांचे अनुसरण करीत, मोठ्या अक्षरात लिहिलेला "प्रभु (LORD)" या शब्दाचा उपयोग करण्यास प्राधान्य देतात. त्या मंडळींसाठी, "सैन्यांचा देव" या शब्दाच्या भाषांतराचा उपयोग जुन्या करारातील "सेनाधीश यहोवा" ह्याच्या जागी करता येईल.

(हे देखील पाहा: देवदूत, अधिकार, देव, प्रभु, परमेश्वर, [परमेश्वर यहोवा] (../kt/lordyahweh.md), यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H0430, H3068, H6635, G29620, G45190