mr_tw/bible/kt/yahweh.md

8.9 KiB
Raw Permalink Blame History

यहोवा

तथ्य:

"यहोवा" ही संज्ञा जुन्या करारातील देवाचे वैयक्तिक नाव आहे. या नावाचे विशिष्ट मूळ अज्ञात आहे, परंतु हे बहुधा "असणे" असा अर्थ असलेल्या इब्री क्रियापासून आले आहे.

  • परंपरेला अनुसरून, अनेक बायबल आवृत्त्या "यहोवास" दर्शविण्यासाठी "परमेश्वर" किंवा "प्रभू" या संज्ञेचा वापर करतात.
  • "यहोवा" च्या संभाव्य अर्थामध्ये, "तो आहे" किंवा "मी आहे" किंवा "एक जो हे सर्व होण्यामागे कारणीभूत आहे" या साज्ञांचा समावेश होतो. या परंपरेचा परिणाम असा झाला की ऐतिहासिकदृष्ट्या, यहुदी लोक यहोवाच्या नावाचा चुकीचा उच्चार करण्याबद्दल भीती बाळगू लागले आणि प्रत्येक वेळी “यहोवा” ही संज्ञा मजकुरामध्ये आली की "परमेश्वर" असे म्हणू लागले. आधुनिक बायबल देवाच्या वैयक्तिक नावाबद्दल आदर दर्शविण्यासाठी आणि "प्रभु" या भिन्न इब्री शब्दापासून वेगळे करण्यासाठी मोठ्या अक्षरांमध्ये "परमेश्वर" असे लिहिते.
  • यूएलटी आणि यूएसटी मजकुर जुन्या करारातील इब्री मजकुराशी असलेल्या सहमतीत या संज्ञेचे भाषांतर, " यहोवा" असे म्हणून नेहमी करतात.
  • "यहोवा" ही संज्ञा नवीन कराराच्या मूळ मजकुरामध्ये कधीच आढळत नाही; जुन्या कराराचा उल्लेख होत असला तरीही, "प्रभू" यासाठी असलेल्या केवळ ग्रीक संज्ञेचा वापर केला जातो.
  • जुन्या करारात, जेव्हा देव स्वतःबद्दल बोलत असे, तेव्हा तो सर्वनामाऐवजी त्याचे नाव वापरत असे.

भाषांतर सूचना

  • "यहोवा" याचे भाषांतर शब्द किंवा वाक्यांश ज्याचा अर्थ "मी आहे" किंवा "जिवंत" किंवा "जो आहे" किंवा "जो जिवंत आहे" याद्वारे केला जाऊ शकतो.
  • हा शब्द जसे "यहोवा" या नावाचे शब्दलेखण आहे, त्या प्रमाणेच लिहिले जाऊ शकतात.
  • काही चर्च संप्रदाय "यहोवा" हा शब्द न वापरणे पसंत करतात आणि त्याऐवजी पारंपारिक प्रस्तुतीकरण "परमेश्वर" या शब्दाचा वापर करतात. एक महत्त्वाचा विचार म्हणजे मोठ्याने वाचताना हे गोंधळात टाकणारे असू शकते कारण ते "प्रभु" या शीर्षकासारखेच वाटेल. काही भाषांमध्ये एक प्रत्यय किंवा इतर व्याकरण चिन्हक असू शकतात जे नाव म्हणून "परमेश्वर" या शब्दाचे (यहोवा) शीर्षक म्हणून "प्रभू" या शब्दापासून वेगळे करण्यासाठी जोडले जाऊ शकते.
  • जर शक्य असेल तर यहोवा हे नाव मजकूरात शब्दश: येते तिथे ठेवणे उत्तम आहे, परंतु काही भाषांतरे मजकूर अधिक नैसर्गिक आणि स्पष्ट करण्यासाठी काही ठिकाणी फक्त सर्वनाम वापरण्याचे ठरवू शकतात.
  • "परमेश्वर असे म्हणतो" असे काहीतरी परिचयासाठी उद्धृत करा.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पाहा: देव, परमेश्वर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • ९:१४ देव म्हणाला, "मी आहे तो आहे. त्यांना सांग, ‘मी आहे याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. त्यांना हेही सांग की, मी यहोवा त्यांच्या पूर्वजांचा अब्राहाम, इसहाक व याकोबा यांचा देव आहे. हेच माझे सनातन नाव आहे.' "
  • १३:४ मग देवाने त्यांना ही वचने दिली व म्हणाला, "मी यहोवा, तुमचा देव आहे, ज्याने तुम्हास मिसरच्या दास्यत्वातून सोडविले. अन्य देवतांची उपासना करू नका."
  • १३:५ "आपल्यासाठी कोरीव मुर्ती करू नका व तिच्या पाया पडू नका, कारण मी, यहोवा, तुझा देव ईर्षावान देव आहे.
  • १६:१ इस्राएली लोक खरा देव, यहोवा याच्याऐवजी कनानी देवतांची उपासना करू लागले.
  • १९:१० मग एलीयाने प्रार्थना केली,‘‘हे परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्या देवा, इस्त्राएलामध्ये तूच देव आहेस व मी तुझा सेवक आहे हे आज आम्हास दाखव."

शब्द समुह:

  • स्ट्रोंग: एच3050, एच3068, एच3069