mr_tw/bible/kt/mercy.md

6.2 KiB

दया, दयाळू

व्याख्या:

“दया” आणि “दयाळू” हे शब्द गरजू लोकांना मदत करणे, विशेषत: जेव्हा ते अत्यंत कठीन किंवा दीन परिस्थितीत असतात याला संदर्भित करते.

  • “दया” या शब्दामध्ये लोकांना चुकीच्या गोष्टी केल्याबद्दल शिक्षा न देणे याचा देखिल समावेश असु शकतो.
  • राजासारख्या सामर्थ्यवान व्यक्तीचे वर्णन “दयाळू” असे केले जाते जेव्हा तो लोकांचे नुकसान करण्याऐवजी दयाळूपणे वागतो.
  • दयाळू असणे म्हणजे ज्याने आपल्याविरुद्ध काहीतरी चूक केली आहे त्याला क्षमा करणे.
  • जेव्हा आम्ही जास्त गरजू लोकांना मदत करतो तेव्हा आम्ही दया दाखवतो.
  • देव आपल्यावर दया करतो आणि आपण इतरांवर दया केली पाहिजे अशी त्याची इच्छा आहे.

भाषांतरातील सूचना:

  • संदर्भानुसार “दया” या शब्दाचे भाषांतर “दयाळूपणा” किंवा “करुणा” किंवा “कळवळा” असे केले जाऊ शकते.
  • “दयाळू” या शब्दाचे भाषांतर “कळवळा दाखवणे” किंवा “दयाळू असणे” किंवा “क्षमा करणे” असे केले जाऊ शकते.
  • “दया दाखवा” किंवा “दया करा” हे भाषांतर “दयाळूपणे वागणे” किंवा “करुणामय होणे.” असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: करुणा, क्षमा करणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • 19:16 त्या (संदेष्टे) सर्वांनी लोकांना सांगितले की मूर्तीची पूजा करणे थांबवा आणि इतरांचा न्याय करा आणि दया दाखवा.
  • 19:17 तो (यिर्मया) विहिरीच्या तळाशी असलेल्या चिखलात खाली बुडाला, परंतु नंतर राजाने त्याच्यावर दया केली आणि आपल्या सेवकांना यिर्मयाला मरण्यापूर्वी विहिरीतून बाहेर काढायला सांगितले.
  • 20:12 पर्शियाचे साम्राज्य बळकट होते परंतु जिंकलेल्या लोकांसाठी ते दयामय होते.
  • 27:11 नंतर येशूने नियमशास्त्राच्या अधिकाऱ्याला विचारले, “तुला काय वाटते? लूटमार करुन मारहाण झालेल्या व्यक्तीचा त्या तिघांपैकी कोण शेजारी होता? ” त्याने उत्तर दिले, "ज्याने त्याच्यावर दया दाखवली."
  • 32:11 परंतु येशू त्याला म्हणाला, “नाही, तू घरी जावे आणि आपल्या मित्रांना आणि आपल्या कुटुंबियांना देवाने तुझ्यासाठी जे काही केले आहे त्याविषयी आणि त्याने तुझ्यावर कशी दया केली आहे हे सांगावे अशी माझी इच्छा आहे.”
  • 34:9 ““परंतु कर वसूल करणारा धार्मिक अधिकार्‍यापासून खूप दूर उभा राहिला, त्याने स्वर्गाकडेही पाहिले नाही. त्याऐवजी, त्याने छाती बडवली आणि प्रार्थना केली, '' देवा, माझ्यावर दया कर कारण मी एक पापी आहे.''

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H2551, H2603, H2604, H2616, H2617, H2623, H3722, H3727, H4627, H4819, H5503, H5504, H5505, H5506, H6014, H7349, H7355, H7356, H7359, G16530, G16550, G16560, G24330, G24360, G36280, G36290, G37410, G46980