7.8 KiB
7.8 KiB
क्षमा करणे, क्षमा पावलेला, क्षमाशीलता, माफ करणे, माफ केले
व्याख्या:
एखाद्याला क्षमा करणे म्हणजे, जरी त्या व्यक्तीने काही अपाय केला असेल तरी, त्या व्यक्तीबद्दल द्वेष न बाळगणे. "क्षमाशीलता" ही एखाद्याला क्षमा करण्याची क्रिया आहे.
- एखाद्याला क्षमा करणे ह्याचा अर्थ सहसा ज्या व्यक्तीने काही चूक केली आहे त्या व्यक्तीला शिक्षा न करणे असा होतो.
- "कर्ज माफ करा" या अभिव्यक्तीमध्ये या संज्ञाचा लाक्षणिकरित्या अर्थ "रद्द करणे" असा केला जाऊ शकतो.
- जेंव्हा लोक त्यांचे पाप कबूल करतात, देव त्यांना वधस्तंभावरील येशूच्या बलिदानाच्या आधारावर क्षमा करतो.
- येशूने त्याच्या शिष्यांना जसे त्यांने त्यांना क्षमा केली तशी दुसऱ्यांना क्षमा करण्यास शिकवले.
"माफ करणे" या शब्दाचा अर्थ एखाद्याला क्षमा करणे आणि त्याला त्याच्या पापाबद्दल शिक्षा न करणे असा होतो.
- या शब्दाचा देखील "क्षमा करणे" असाच अर्थ होतो, पण त्याच्यामध्ये दोषी असलेल्या व्यक्तीला शिक्षा न करण्याबद्दल औपचारिक निर्णयाचा समावेश असण्याची शक्यता आहे.
- न्यायालयामध्ये, एक न्यायाधीश गुन्ह्यामध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तीला क्षमा करू शकतो.
- जरी आपण पापामुळे दोषी असलो, तरी येशु ख्रिस्ताने वधस्तंभावरील आपल्या बलिदानाच्या मृत्युच्या आधारावर, त्याने आपल्याला नरकामध्ये मिळणाऱ्या शिक्षेपासून माफ केले.
भाषांतर सूचना:
- संदर्भाच्या आधारावर, "क्षमा करणे" याचे भाषांतर "माफ करणे" किंवा "रद्द करणे" किंवा "सोडून देणे" किंवा (एखाद्याच्या) "विरोधात काहीही न धरणे" असे केले जाऊ शकते.
- "क्षमाशीलता" या संज्ञेचे भाषांतर "न चिडण्याचा सराव करणे" किंवा "(एखादा) दोषी नसल्याची घोषणा करणे" किंवा "माफीचे कृत्य करणे" अशा अर्थाच्या शब्दानी किंवा वाक्यांशाने केले जाऊ शकते.
- क्षमा करण्यासाठीच्या औपचारिक निर्णयासाठी भाषेत एखादा शब्द असेल, तर तो शब्द "माफ करणे" याच्या भाषांतरासाठी वापरला जाऊ शकतो.
(हे देखील पाहा: दोष)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- उत्पत्ति ५०:१७
- गणना १४:१७-१९
- अनुवाद २९:२०-२१
- यहोशवा २४:१९-२०
- २ राजे ५:१७-१९
- स्तोत्र २५:११
- स्तोत्र २५:१७
- यशया ५५:६
- यशया ४०:२
- लुक ५:२१
- प्रेषितांची कृत्ये ८:२२
- इफिसकरांस पत्र ३:३१-३२
- कलस्सैकरांस पत्र ३:१२-१४
- १ योहान २:१२
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
- ७:१० परंतु एसावाने अगोदरच याकोबास क्षमा केली होती, आणि त्यांना एकमेकांना भेटून आनंद झाला.
- १३:१५ मोशे पुन्हा पर्वतावर चढला व त्याने देवाने लोकांना क्षमा करावी अशी प्रार्थना केली. देवाने मोशेचे ऐकले व त्यांना क्षमा केली.
- १७:१३ दाविदाने आपल्या पापाविषयी पश्चाताप केला आणि देवाने त्यास क्षमा केली.
- २१:५ नव्या करारामध्ये, देव आपल्या आज्ञा मनुष्यांच्या हृदयावर लिहिल, लोक देवाला वैयक्तीकरित्या ओळखतील,ते त्याचे लोक होतील, आणि देव त्यांच्या पापांची क्षमा करील.
- २९:१ एके दिवशी पेत्राने येशूला विचारले,‘‘प्रभुजी, जेंव्हा माझा भाऊ माझ्याविरुद्ध अपराध करील तेव्हा मी त्यास किती वेळा क्षमा करावी?’’
- २९:८ तू मला गयावया केल्यामुळे मी तुझे कर्ज माफ केले.
- ३८:५ मग येशूने एक प्याला घेऊन म्हटले, ‘‘ ह्यातुन प्या. हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. ते अनेकांच्या पापाच्या क्षमेसाठी ओतले जात आहे.
शब्द माहीती:
- एच5546, एच5547, एच3722, एच5375, एच5545, एच5547, एच7521, जी859, जी863, जी5483