7.2 KiB
7.2 KiB
बाप्तिस्मा देणे, बाप्तिस्मा घेतला, बाप्तिस्मा
व्याख्या:
नवीन करारामध्ये, "बाप्तिस्मा देणे" आणि "बाप्तिस्मा" या संज्ञा सामान्यत: एखादा ख्रिस्ती व्यक्ती पापापासून शुद्ध झाला आहे आणि ख्रिस्ताशी एकरूप झाला आहे हे दर्शविण्यासाठी त्यास पाण्याने पारंपारिकरित्या स्नान घालणे यास संदर्भित करतात.
भाषांतर सूचना:
- एखाद्या व्यक्तीने पाण्याने बाप्तिस्मा कसा घ्यावा याबद्दल ख्रिस्ती लोकांची भिन्न मते आहेत. सामान्यतः या संज्ञेचे भाषांतर करणे सर्वोत्तम आहे जे पाण्याचा उपयोग विविध मार्गाने करण्यास अनुमती देते.
- संदर्भाच्या आधारावर, "बाप्तिस्मा देणे" या शब्दाचे भाषांतर "शुद्ध होणे," "बाहेर टाकणे," "आत डुबकी मारणे (किंवा बुडविणे) " किंवा "धुणे" असे केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, " तुला पाण्याने बाप्तिस्मा देतो" याचे भाषांतर "तुला पाण्यात बुडवितो" असाही होऊ शकतो.
- "बाप्तिस्मा" या शब्दाचे भाषांतर "शुध्दीकरण," "च्या वर ओतणे," "बुडविणे", "स्वच्छ करणे" असे केले जाऊ शकते.
- स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेतील पवित्र शास्त्राच्या भाषांतरांत या शब्दाचे भाषांतर कसे केले गेले आहे याचा देखील विचार करा.
(हे देखील पाहाः अज्ञात कसे भाषांतरित करावे)
(हे देखील पहा: (बाप्तीस्मा करणारा) योहान, पश्चाताप करणे, पवित्र आत्मा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- प्रेषितांची कृत्ये 2:38
- प्रेषितांची कृत्ये 8:36
- प्रेषितांची कृत्ये 9:18
- प्रेषितांची कृत्ये 10:48
- लुक 3:16
- मत्तय 3:14
- मत्तय 28:18-19
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
- __24:3__जेव्हा लोकांनी योहानाचा संदेश ऐकला, अनेक लोकांनी आपल्या पापांचा पश्चाताप केला, आणि योहानाने त्यांना बाप्तिस्मा दिला. अनेक धार्मिक पुढारी देखील योहानाकडू बाप्तिस्मा घेण्यासाठी आले, परंन्तु त्यांनी आपल्या पापांविषयी पश्चात्ताप केला नव्हता व आपले पाप कबूल केले नव्हते.
- 24:6 दूस-या दिवशी येशू योहानाकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी आला.
- 24:07 योहान येशूला म्हणाला, ‘‘मी तुला बाप्तिस्मा देण्यास पात्र नाही. त्याऐवजी तू मला बाप्तिस्मा द्यावा.
- 42:10 म्हणून, तुम्ही जा व सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य बनवा आणि पिता, पुत्र व पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या, आणि मी आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळावयास शिकवा.
- 43:11 पेत्र त्यांना म्हणाला, "तुम्हांपैकी प्रत्येकाने आपआपल्या पापांचा पश्चाताप करुन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्यावा, म्हणजे देव तुम्हास तुमच्या पापांची क्षमा करील.
- 43:12 तेव्हा सुमारे 3,000 लोकांनी पेत्राच्या बोलण्यावर विश्वास ठेविला व ते येशूचे शिष्य झाले. त्यांनी बाप्तिस्मा घेतला व यरूशलेमेच्या मंडळीमध्ये सामिल झाले.
- 45:11 फिलिप्प आणि कूशी अधिकारी पुढे प्रवास करत असताना, ते एका तळ्याजवळ आले. कूशी अधिकारी म्हणाला, "पाहा! येथे काही पाणी आहे! मी बाप्तिस्मा घेऊ शकतो का?"
- 46:05 लगेच शौलाला पुन्हा दिसू लागले, आणि हनन्याने त्यास बाप्तिस्मा दिला.
- 49:14 येशू आपणांस आमंत्रण देत आहे यासाठी की तुम्ही विश्वास धरावा व बाप्तिस्मा घ्यावा.
शब्द माहीती:
- स्ट्रोंग: जी907