7.1 KiB
7.1 KiB
पवित्र आत्मा, देवाचा आत्मा, परमेश्वराचा आत्मा, आत्मा
तथ्य
या संज्ञा सर्व पवित्र आत्म्याला संदर्भित आहेत, जो देव आहे. एकच खरा देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा म्हणून सार्वकालीकतेने अस्तित्वात आहे.
- पवित्र आत्म्याला “आत्मा” आणि “परमेश्वराचा आत्मा” आणि “सत्याचा आत्मा” असेही म्हटले जाते.
- कारण पवित्र आत्मा देव आहे, तो पूर्णपणे पवित्र आहे, अपरिमितपणे शुद्ध आहे, आणि त्याच्या सर्व स्वभावात आणि तो जे काही करतो त्यामध्ये नैतिकदृष्ट्या परिपूर्ण आहे.
- पिता आणि पुत्रासमवेत, पवित्र आत्मा जगाच्या निर्मितीमध्ये सक्रिय होता.
- जेव्हा देवाचा पुत्र येशू स्वर्गात परत गेला तेव्हा देवाने आपल्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांना शिकविण्यास, दिलासा देण्यास आणि देवाच्या इच्छेनुसार करण्यास सक्षम होण्यासाठी पवित्र आत्मा पाठविला.
- पवित्र आत्म्याने येशूला मार्गदर्शन केले आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना तो मार्गदर्शन करतो.
भाषांतरातील सूचना:
- ही संज्ञा “पवित्र” आणि “आत्मा” असे भाषांतर करण्यासाठी वापरल्या जाणार्या शब्दासह भाषांतरीत करता येईल.
- हा शब्द भाषांतरित करण्याच्या पध्दतीमध्ये “शुद्ध आत्मा” किंवा “आत्मा जो पवित्र आहे” किंवा “देव जो आत्मा” यांचा समावेश असू शकतो.
(हे देखील पाहा: पवित्र, आत्मा, देव, परमेश्वर, देव जो पिता, देवाचा पुत्र, भेट)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 शमु 10:10
- 1 थेस्सलनी 4:7-8
- प्रेषित 8:17
- गलती 5:25
- उत्पत्ती 1:1-2
- यशया 63:10
- ईयोब 33:4
- मत्तय 12:31
- मत्तय 28:18-19
- स्तोत्र 51:10-11
पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:
- 1:1 पण देवाचा आत्मा पाण्यावर होता.
- 24:8 बाप्तिस्मा घेतल्यावर येशू पाण्यातून बाहेर आला तेव्हा, __देवाचा आत्मा__कबुतराच्या रुपात प्रकट झाला आणि खाली आला व त्याच्यावर स्थिर झाला.
- 26:1 सैतानाच्या मोहांवर विजय मिळवल्यानंतर, येशू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो राहत असलेल्या गालील प्रदेशात परतला.
- 26:3 येशू वाचतो, “देवाने मला त्याचा आत्मा दिला आहे” जेणेकरून मी गोरगरीबांना सुवार्ता घोषित करावी, बंदिवानांना मुक्त करावे, आंधळ्यांना दृष्टी द्यावी आणि दडपलेल्यांना सोडवावे.”
- 42:10 "म्हणून जा, सर्व लोकांना पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देऊन शिष्य करा आणि मी तुला जे आज्ञापिले आहे ते सर्व पाळायला शिकवा."
- 43:3 ते सर्व पवित्र आत्म्याने भरले आणि ते अन्य भाषांमध्ये बोलू लागले.
- 43:8 “आणि येशूने वचन दिल्याप्रमाणे त्याने पवित्र आत्मा”पाठविला आहे. आपण आता ज्या गोष्टी पाहात आणि ऐकत आहात त्या सर्वांनाच “पवित्र आत्मा” कारणीभूत आहे. ”
- 43:11 पेत्राने उत्तर दिले, “तुमच्यातील प्रत्येकाने पश्चात्ताप केला पाहिजे व येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेतला पाहीजे, यासाठी की देव तुमच्या पापांची क्षमा करील. मग तो तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान देईल.”
- 45:1 त्याची (स्तेफन) चांगली प्रतिष्ठा होती आणि तो पवित्र आत्मा आणि शहाणपणाने परिपूर्ण होता.
शब्द संख्या:
- स्ट्रोंग: H3068, H6944, H7307, G00400, G41510