mr_tw/bible/other/thorn.md

3.1 KiB

काटा, काटेरी झुडूप, काटेरी झुडुपात, काटे, कुसळ, कुसळे

तथ्य:

काटेरी झुडुपे आणि कुसळे या वनस्पती आहेत, ज्यांना काटेरी फांद्या किंवा फुले असतात. या वनस्पती कोणतेही फळ किंवा उपयोगी असे काहीही उत्पन्न करीत नाहीत.

  • एक "काटा" हा वनस्पतीच्या खोडावर किंवा फांदीवर वाढ झालेला कठीण, तीक्ष्ण भाग असतो. * एक "काटेरी झुडूप" हे एक छोट्या झाडाचा किंवा झुडपाचा प्रकार आहे, ज्याला त्याच्या फांद्यांवर अनेक काटे असतात.
  • एक "कुसळ" ही अशी वनस्पती आहे, जीला काटेरी खोड आणि पाने असतात. बऱ्याचदा ह्याची फुले जांभळ्या रंगाची असतात.
  • काटे आणि कुसळाच्या वनस्पतींची वाढ लवकर होते, आणि त्या वनस्पती जवळच्या वनस्पतींची किंवा पिकांची वाढ थांबवण्यास कारणीभूत ठरतात. कसे पाप मनुष्याला चांगली आत्मिक फळे उत्पन्न करण्यापासून रोखते, हे ह्याचे चित्र आहे.
  • येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यापूर्वी काट्यांच्या फांद्यांना वाकवून बनवलेला मुकुट त्याच्या डोक्यावर ठेवण्यात आला.
  • शक्य असल्यास, या शब्दांचे भाषांतर दोन वेगवेगळ्या वनस्पतींच्या किंवा झुडुपांच्या नावाने केले गेले पाहिजे, ज्यांना प्रकल्पित भाषेच्या भागात ओळखले जाते.

(हे सुद्धा पहा: मुकुट, फळ, आत्मा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H329, H1863, H2312, H2336, H4534, H5285, H5518, H5544, H6791, H6796, H6975, H7063, H7898, G173, G174, G4647, G5146