mr_tw/bible/other/crown.md

5.3 KiB

मुकुट, मुकुट देणे, मुकुट घातला

व्याख्या:

राज्यकर्त्यांच्या जसे की, राजा आणि राणी ह्यांच्या डोक्यावर घातलेला, मुकुट एक सजवलेला गोलाकार टोप आहे. "मुकुट" या शब्दाचा अर्थ एखाद्याच्या डोक्यावर मुकुट ठेवणे; लाक्षणिक अर्थाने, त्याचा "सन्मान" करणे असा होतो.

  • मुकुट सामान्यत: सोने किंवा चांदीपासून बनलेले असतात आणि हिरवा पाचू आणि हिऱ्यासारखी मौल्यवान रत्ने त्यावर जडलेली असतात.
  • एक मुकुट हा राजाच्या शक्तीचे आणि संपत्तीचे प्रतिक म्हणून बनवण्याचा हेतू होता.
  • याउलट, रोमी सैनिकांनी येशूच्या डोक्यावर ठेवलेल्या काट्यांच्या शाखांनी बनलेला मुकुट त्याची थट्टा करण्यासाठी व त्याला दुखवण्यासाठी केला होता.
  • प्राचीन काळी, मैदानी खेळातील विजेत्यांना जैतुनाच्या झाडाच्या फांद्यापासून बनवलेले मुकुट देण्यात येत असत. प्रेषित पौलाने या मुकुटाचा उल्लेख त्याच्या तीमोथ्याला लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात केला आहे.
  • लाक्षणिक अर्थाने उपयोग करतात तेंव्हा, "मुकुट" ह्याचा अर्थ एखाद्याला सन्मान देणे असा होतो. आपण देवाची आज्ञा मानून आणि इतरांकडे त्याची स्तुती करून त्याचा सन्मान करतो. हे त्याला मुकुट घालणे आणि तो राजा आहे हे कबूल करण्यासारखे आहे.
  • पौल त्याच्या सहकारी विश्वासुंना त्याचा "आनंद आणि मुकुट" म्हणतो. या अभिव्यक्तीमध्ये, "मुकुट" लाक्षणिक अर्थाने वापरण्यात आला आहे, याचा अर्थ, या विश्वासूंनी देवाची सेवा करण्याकरता विश्वासू राहण्याद्वारे, पौलाला खूप आशीर्वादित आणि सन्मानित केले गेले आहे.
  • जेंव्हा लाक्षणिक अर्थाने वापरले जाते, तेंव्हा ह्याचे भाषांतर "बक्षीस" किंवा "सन्मान" किंवा "प्रतिफळ" असे केले जाऊ शकते.
  • "मुकुट" च्या लाक्षणिक उपयोगाचे भाषांतर "सन्मान" किंवा "सजवणे" असे केले जाऊ शकते.
  • जर एखाद्या मनुष्याला "मुकुट घातला," तर ह्याचे भाषांतर "त्याच्या डोक्यावर मुकुट ठेवला" असे केले जाऊ शकते.
  • "त्याला गौरव व सन्मान ह्यांचा मुकुट घातला" या अभिव्यक्तीचे भाषांतर "त्याला गौरव व सन्मान ही देण्यात आली" किंवा "त्याला गौरव आणि सन्मान दिला" किंवा "त्याने गौरव आणि सन्मान स्वीकार केले" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: गौरव, राजा, जैतून)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2213, H3803, H3804, H4502, H5145, H5849, H5850, H6936, G1238, G4735, G4737