mr_tw/bible/other/sow.md

4.9 KiB

वनस्पती, लावणे, लागवड, मुळावलेली, रोपण केलेले, पेरणे, पेरतो, पेरण्याच्या, पेरणी

व्याख्या:

एक "वनस्पती" ही सामान्यपणे असे काहीतरी आहे, जी वाढते आणि जमिनीशी जोडलेली असते. "पेरणे" ह्याचा अर्थ वनस्पती वाढण्यासाठी बी जमिनीमध्ये पुरणे असा होतो. एक "पेरणारा" हा एक मनुष्य आहे जो पेरतो किंवा बी लावतो.

  • पेरणी किंवा पेरणीची पद्धत वेगवेगळी असते, पण एक पद्धत अशी आहे की बियाणांची मूठ भरून ती जमिनीवर विखुरली जाते.
  • बियाणे पेरण्याची दुसरी पद्धत म्हणजे जमिनीमध्ये छिद्र करणे आणि प्रत्येक छिद्रामध्ये बी ठेवणे.
  • "पेरणे" हा शब्द लाक्षणिक पद्धतीने वापरला जाऊ शकतो, जसे "जो कोणी पेरतो तो त्याचे पीक घेईल." * ह्याचा अर्थ असा आहे की, जर त्या व्यक्तीने वाईट केले, तर त्याला नकारात्मक परिणाम मिळेल, आणि जर त्या व्यक्तीने चांगले केले, तर त्याला सकारात्मक परिणाम मिळेल.

भाषांतर सूचना

  • "पेरणे" या शब्दाचे भाषांतर "वनस्पती" असे देखील केले जाऊ शकते. हे भाषांतरित करण्यासाठी वापरला जाणाऱ्या शब्दामध्ये पेरणीच्या बियाणांचा समावेश होऊ शकतो ह्याची खात्री करा.
  • "पेरणारा" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "लागवड करणारा" किंवा "शेतकरी" किंवा "बी पेरणारा व्यक्ती" ह्यांचा समावेश केला जाऊ शकतो.
  • इंग्रजीमध्ये, "पेरणे" हा शब्द केवळ बिया पेरण्याकरिता वापरला जातो, पण इंग्रजी शब्द "लागवड करणे (Plant)" हा शब्द बियांची तसेच मोठ्या गोष्टी जसे की, झाडे लावण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो. इतर भाषांमध्ये देखील लागवड करण्याच्या गोष्टींच्या आधारावर वेगवेगळ्या शब्दांचा वापर होऊ शकतो.
  • "एखादा व्यक्ती जे पेरतो ते कापतो" या अभिव्यक्तीचे भाषांतर "ज्याप्रमाणे एखाद्या विशिष्ट प्रकारचे बीज विशिष्ट प्रकारचे वनस्पती उत्पन्न करतात, तशाच प्रकारे एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या कृत्यामुळे चांगले परिणाम होतात आणि एखाद्या व्यक्तीच्या वाईट कृत्यामुळे वाईट परिणाम होतात असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पाहा: दुष्ट, चांगले, कापणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2221, H2232, H2233, H2236, H4218, H4302, H5193, H7971, H8362, G4687, G4703, G5300, G5452 , G6037