mr_tw/bible/other/reap.md

2.8 KiB

कापणी, कापतो, कापणी केली, कापणी करणारा, कापणी करणारे, कापणी करणे

व्याख्या:

"कापणी" या शब्दाचा अर्थ पीक, जसे की, धान्य, ह्याची कापणी करणे. "कापणी करणारा" म्हणजे असा कोणीतरी, जो पिकांना कापतो.

  • सहसा कापणी करणारे वनस्पतींना हाताने ओढून किंवा त्यांना कापायच्या धारधार शस्त्राने कापून पिकांची कापणी करतात.
  • पिकांची कापणी करण्याच्या कल्पनेला बऱ्याचदा लाक्षणिक अर्थाने वापरले जाते, ज्याचा संदर्भ लोकांना येशूबद्दलची सुवार्ता सांगून त्यांना देवाच्या कुटुंबाचा भाग बनवण्याशी येतो.
  • या शब्दाचा संदर्भ लाक्षणिक अर्थाने, एखाद्या मनुष्याच्या कृत्यांचे परिणाम ह्याच्या संदर्भात सुद्धा केला जाऊ शकतो, जसे की अशा म्हणण्यामध्ये, "मनुष्य जे पेरतो तो ते कापणी करील" (पहा: रूपक.
  • "कापणी" आणि "कापणारा" या शब्दांचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "आलेल्या पिकाची कापणी" किंवा "आलेल्या पिकाची कापणी करणारा" (किंवा "जो व्यक्ती कापणी करतो तो") असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहाः शुभ वार्ता, हंगाम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H4672, H7114, H7938, G270, G2325, G2327