mr_tw/bible/other/shield.md

2.6 KiB

ढाल, ढाली

व्याख्या:

एक ढाल ही युद्धामध्ये सैनिकाने शत्रूंच्या शस्त्राने जखमी होण्यापासून वाचून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी धरलेली एक वस्तू आहे. एखाद्या व्यक्तीची "ढाल" बनणे ह्याचा अर्थ त्या व्यक्तीला हानी होण्यापासून वाचवणे असा होतो.

  • ढाली ह्य सहसा गोलाकार किंवा अंडाकृती होत्या, आणि त्यांना चमडे, लाकूड, किंवा धातू ह्यांच्यापासून बनवण्यात येत असे, आणि त्या इतक्या मजबूत आणि जाड असत त्यातून भाला किंवा तलवार आत येणे अशक्य होते.
  • या शब्दाचा रूपक अर्थाने उपयोग करून, पवित्र शास्त्र देवाचा संदर्भ त्याच्या लोकांसाठी संरक्षक ढाल म्हणून देते. (पहा: रूपक)
  • पौल "विश्वासाची ढाल" ह्याबद्दल बोलतो, जी येशूवर विश्वास ठेवण्यामुळे आणि देवाची आज्ञा पाळण्यामुळे विश्वासणाऱ्यांचे सैतानी हल्ल्यापासून संरक्षण होते, असे सांगण्याची एक लाक्षणिक पद्धत आहे.

(हे सुद्धा पहा: विश्वास, आज्ञापालन, सैतान, आत्मा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2653, H3591, H4043, H5437, H5526, H6793, H7982, G2375