mr_tw/bible/kt/satan.md

7.5 KiB
Raw Permalink Blame History

सैतान, दुष्ट

तथ्य:

जरी सैतान हा देवाने बनवलेला आत्मा आहे, तरी त्याने देवाविरुद्ध बंड केले आणि ती देवाचा शत्रू बनला. सैतानाला "सैतान" किंवा "दुष्ट" असेही संबोधले जाते.

  • देव आणि जे काही देवाने निर्माण केले आहे, त्याचा सैतान तिरस्कार करतो कारण त्याला देवाची जागा घ्यायची आहे आणि देव म्हणून स्वतःची उपासना करवून घ्यायची आहे.
  • सैतान लोकांना देवाविरुद्ध बंड करण्यासाठी मोहात पडतो.
  • देवाने त्याच्या पुत्राला, येशूला, लोकांना सैतानाच्या तावडीतून सोडवण्यासाठी पाठविले.
  • सैतान या नावाचा अर्थ "विरोधक" किंवा "शत्रू."
  • "दुष्ट" या शब्दाचा अर्थ "दोष लावणारा."

भाषांतर सूचना

  • "दुष्ट" या शब्दाचे भाषांतर "दोष लावणारा" किंवा "एक दुष्ट" किंवा "दुष्ट आत्म्यांचा राजा" किंवा "दुष्टात्म्यांचा मुख्य" असे देखील केले जाऊ शकते.
  • "सैतान" ह्याचे भाषांतर "विरोधक" किंवा "प्रतिस्पर्धी" किंवा दुसरे एखादे नाव ज्याने हे कळेल की, तो दुष्ट आहे, असे केले जाऊ शकते.
  • या शब्दाचे भाषांतर "पिसाच्य" आणि "दुष्ट आत्मे" यापासून वेगळे असावे.
  • या संज्ञा राष्ट्रीय भाषा किंवा अन्य स्थानिक भाषेत कशा प्रकारे भाषांतरित केल्या जातात ते देखील विचारात घ्या.

(पहाः अज्ञात कसे भाषांतरित करायचे

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: पिसाच्च, दुष्ट, देवाचे राज्य, मोह

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 21:01 ज्या सापाने हव्वेस फसविले तो सैतान होता. हया अभिवचनाचा अर्थ असा होता की मसिहा सैतानास पुर्णपणे पराजित करील.
  • 25:06 मग सैतानाने येशूला जगातील सर्व राज्ये व वैभव दाखविले व म्हणाला,‘‘जर तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे तुला देईन.
  • 25:08 अशा प्रकारे येशू सैतानाच्या मोहाला बळी पडला नाही, म्हणून सैतान त्याला सोडून तेथून निघून गेला.
  • 33:06 म्हणून येशूने स्पष्टिकरण केले, ‘‘बी हे देवाचे वचन आहे. वाटेवरची जमीन म्हणजे असा व्यक्ती की जो देवाचे वचन ऐकतो पण समजून घेत नाही आणि सैतान येऊन ते मनातून काढून टाकतो.
  • 38:07 यहूदाने भाकर घेतल्याबरोबर, सैतानाने त्याच्यामध्ये प्रवेश केला.
  • 48:04 देवाने अभिवचन दिले की हव्वेचा एक वंशज सैतानाचे डोके फोडिल व सैतान त्याची टाच फोडिल. * अर्थात सैतान मसिहास जीवे मारील, परंतु देव त्यास पुन्हा जिवंत करील आणि मग मसिहा सैतानाच्या सत्तेचा संपूर्ण नायनाट करील.
  • 49:15 देवाने आपणांस सैतानाच्या अंधःकारमय राज्यातून काढून आपल्या प्रकाशाच्या राज्यामध्ये आणिले आहे.
  • 50:09 "निदण म्हणजे सैतानाचे लोक. ज्या शत्रूने निदण पेरले, तो शत्रू म्हणजे सैतान.
  • 50:10 "जेव्हा जगाचा शेवट होईल, तेव्हा देवदूत सैतानाच्या सर्व लोकांस न भडकणाऱ्या अग्निमध्ये टाकून देईल, तेथे रडणे व दात खाणे चालेल.
  • 50:15 जेव्हा येशू परत येईल, तो सैतान व त्याच्या राज्याचा नाश करील. तो सैतानाला नरकात टाकील, ज्या ठिकाणी तो सर्वकाळ जळत राहील, त्याच्याबरोबर ज्यांनी त्याच्या मागे जाण्याचे निवडले व देवाची आज्ञा मानली नाही तेही असतील.

Strong's

  • Strong's: H7700, H7854, H8163, G1139, G1140, G1141, G1142, G1228, G4190, G4566, G4567