mr_tw/bible/other/sackcloth.md

2.9 KiB

गोणताट

व्याख्या:

गोणताट हे खडबडीत, खरखरीत प्रकारचे वस्त्र होते, ज्याला शेळ्यांच्या केसापासून किंवा उंटांच्या केसापासून बनवले जात होते.

  • जो व्यक्ती त्यापासून तयार केलेले कपडे घालत असे, तो अस्वस्थ होत असे. गोणताट हे शोक, दुःख किंवा नम्र पश्चात्ताप दाखवण्यासाठी घातले जात होते.
  • "गोणताट आणि राख" या वाक्यांश, पारंपारिक दुःख आणि पश्चात्ताप ह्यांना व्यक्त करण्यासाठीचा सामान्य अभिव्यक्ती होता.

भाषांतर सूचना

  • ह्याचे भाषांतर "प्राण्यांच्या केसापासून बनवलेले खडबडीत वस्त्र" किंवा "शेळीच्या केसापासून बनवलेले वस्त्र" किंवा "खडबडीत, खरखरीत वस्त्र" असे देखील केले जाऊ शकते.
  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर मार्ग "खडबडीत, खरखरीत शोकाचे वस्त्र" असा असू शकतो.
  • "गोणताट नेसून राखेत बसला" या वाक्यांशाचे भाषांतर "खरखरीत वस्त्रे नेसून आणि राखेत बसून शोक आणि नम्रपणा दाखवणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: अज्ञात कसे भाषांतरित करायचे

(हे सुद्धा पहा: राख, उंट, शेळी, नम्र, शोक, पश्चात्ताप, चिन्ह)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H8242, G4526