mr_tw/bible/other/ash.md

2.9 KiB

राख, धूळ

तथ्य:

"राख" या शब्दाचा संदर्भ, राखाडी चूर्णयुक्त पदार्थाशी आहे जो लाकूड जाळून झाल्यानंतर मागे राहते. काहीवेळा लाक्षणिक अर्थाने त्याचा संदर्भ निरर्थक किंवा निरुपयोगी आहे असे सांगण्यासाठी दिला जातो.

  • पवित्र शास्त्रामध्ये राखेबद्दल बोलत असताना काही वेळा "धूळ" हा शब्द वापरला आहे. त्यांचा कोरड्या जमिनीवर तयार होणारे बारीक, सैल धुलीकण म्हणून देखील संदर्भ देऊ शकतो.
  • "राखेची रास" म्हणजे राखेचा एक ढीग.
  • प्राचीन काळात, राखेमध्ये बसूणे म्हणजे शोक किंवा दु:ख व्यक्त करण्याचे लक्षण होते.
  • दुःखी असताना, गोणपाट नेसून राखेत बसण्याची किंवा राख डोक्यावर ओतून घेण्याची प्रथा होती.
  • डोक्यावर राख लावणे हे देखील निराशेचे किंवा पेचप्रसंगाचे चिन्ह होते.
  • निरुपयोगी गोष्टींसाठी प्रयत्नशील असण्याला "राखेवर जगणे" असे म्हटले जाते.
  • "राखेचे" भाषांतर करताना, लाकूड जळल्यानंतर राहिलेल्या अवशेषांना संदर्भित करणाऱ्या प्रकल्प भाषेतील योग्य शब्दांचा वापर करा.
  • लक्षात ठेवा की "आश वृक्ष" हा पूर्णपणे भिन्न शब्द आहे

(हे सुद्धा पहाः अग्नि, गोणपाट)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H80, H665, H666, H766, H1854, H6083, H6368, H7834, G2868, G4700, G5077, G5522