mr_tw/bible/other/rod.md

3.3 KiB

काठी, काठ्या

व्याख्या:

"काठी" या शब्दाचा संदर्भ अरुंद, घन, काठी सारखे हत्यार, ज्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाऊ शकते. ती कदाचित कमीत कमी एक मीटर लांबीची असावी.

  • लाकडी काठीचा उपयोग मेंढपाळांकडून इतर प्राण्यांपासून मेंढरांचे रक्षण करण्यासाठी केला जात होता. ती मेंढरांना परत आणण्यासाठी भटकलेल्या मेंढराकडेही फेकून दिली जात होती.
  • स्तोत्रसंहिता 23 मध्ये, दावीद राजा "काठी" आणि "आकडी" या शब्दांचा उपयोग, देवाचे त्याच्या लोकांच्यासाठीचे मार्गदर्शन आणि शिस्त ह्यांना संदर्भित करण्यासाठी करतो.
  • एका मेंढपाळाच्या काठीचा उपयोग, जशी मेंढरे काठीच्या खालून जात तशी त्यांची मोजदाद करण्यासाठी सुद्धा होत होता.
  • अजून एक रूपकात्मक अभिव्यक्ती, "लोखंडाची काठी" ह्याचा संदर्भ, जे लोक देवाच्या विरुद्ध बंडखोरी करतात आणि दुष्ट गोष्टी करतात, त्यांना देव शिक्षा करेल ह्याच्या संबंधात येतो.
  • प्राचीन काळी, मोजदाद करण्याची काठी धातूपासून, लाकडापासून किंवा दगडापासून बनवत होते, आणि त्याचा उपयोग एखाद्या इमारतीची किंवा वस्तूची लांबी मोजण्यासाठी केला जात असे.
  • पवित्र शास्त्रामध्ये, लाकडी काठीचा संदर्भ मुलांना शिस्त लावण्याचे साधन म्हणून सुद्धा आलेला आहे.

(हे सुद्धा पहा: आकडी, मेंढरू, मेंढपाळ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2415, H4294, H4731, H7626, G2563, G4463, G4464