mr_tw/bible/other/reject.md

4.4 KiB

नकार देणे, नकार दिला, नाकारले, सोडून देणे (नाकारणे), अस्वीकार (नकार)

व्याख्या:

एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला "नकार देणे" ह्याचा अर्थ त्या व्यक्तीला किंवा वस्तूला स्वीकारण्यास मनाई करणे असा होतो.

  • "नकार देणे" या शब्दाचा अर्थ एखाद्यावर "विश्वास ठेवण्यास नकार देणे" असा देखील होतो.
  • देवाला नाकारणे ह्याचा अर्थ त्याची आज्ञा पाळण्यास नकार देणे असा होतो.
  • जेंव्हा इस्राएली लोकांनी मोशेच्या नेतृत्वाला नाकारले, ह्याचा अर्थ त्यांनी त्याच्या अधिकाराविरूद्ध बंडखोरी केली. त्यांना त्याची आज्ञा पाळण्याची इच्छा नव्हती.
  • जेंव्हा इस्राएली लोक खोट्या देवांची उपासना करू लागले, त्याने हे दाखवून दिले की, त्यांनी देवाला नाकारले आहे.
  • या शब्दाचा शब्दशः अर्थ "दूर ढकलणे" हा शब्द होतो. इतर भाषेमध्ये कदाचित एखाद्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे किंवा नकार देणे ह्याच्या अर्थाची समान अभिव्यक्ती असू शकते.

भाषांतर सूचना

  • संदर्भावर आधारित, "नाकारणे" या शब्दाचे भाषांतर "स्वीकार न करणे" किंवा "मदत करण्याचे थांबवणे" किंवा "आज्ञा पाळण्यास नकार देणे" किंवा "आज्ञा पालन करणे थांबवणे" असे केले जाऊ शकते.
  • "बांधनाऱ्यांनी नापसंत केलेला दगड" या अभिव्यक्तीमध्ये "नापसंत" ह्याचे भाषांतर "वापरण्यास नकार दिलेला" किंवा "स्वीकार न केलेला" किंवा "फेकून दिलेला" किंवा "नालायक म्हणून मुक्त केलेला" असे केले जाऊ शकते.
  • अशा लोकांच्या संदर्भात ज्यांनी देवाच्या आज्ञाना नकार दिला, ह्यामध्ये नकार दिला ह्याचे भाषांतर, त्याच्या आज्ञा "पाळण्यास नकार दिला" किंवा देवाच्या नियमांना "हट्टीपणाने स्वीकार करण्याचे नाकारणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: आज्ञा, आज्ञाभंग, आज्ञापालन, ताठ मानेचे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H947, H959, H2186, H2310, H3988, H5006, H5034, H5186, H5203, H5307, H5541, H5800, G96, G114, G483, G550, G579, G580, G593, G683, G720, G1609, G3868