mr_tw/bible/other/qualify.md

2.8 KiB

पात्र, अपात्र

व्याख्या:

"पात्र" या शब्दाचा अर्थ, ठराविक फायदे प्राप्त करण्यासाठी, अधिकार मिळवणे किंवा विशिष्ठ कौशल्ये असल्यामुळे ओळखले जाणे असा होतो.

  • एक व्यक्ती जो, एखाद्या कामासाठी "पात्र" आहे, म्हणजे त्याच्याकडे त्या कामासाठी गरजेची असणारी कौशल्ये आणि प्रशिक्षण आहे.
  • पौलाचे त्याच्या कलस्सैकरांसच्या पत्रामध्ये, प्रेषित पौल असे लिहितो की, देव जो पिता, त्याने त्याच्या विश्वासणाऱ्यांना त्याच्या प्रकाशाच्या राज्यात सहभागी होण्यासाठी "पात्र" केले आहे. ह्याचा अर्थ देवाने त्यांना दैवी जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे सर्व काही दिलेले आहे.
  • विश्वासू देवाच्या प्रकाशाच्या राज्याचा भाग होण्याचा अधिकार मिळवू शकत नाही. तो फक्त पात्र झाला, कारण देवाने त्याला ख्रिस्ताचे रक्त देऊन सोडवले आहे.

भाषांतर सूचना

  • संदर्भाच्या आधारावर, "पात्र" याचे भाषांतर "सुसज्ज" किंवा "कौशल्यपूर्ण" किंवा "सक्षम" असे केले जाऊ शकते.
  • एकाद्याला "पात्र" करणे, ह्याचे भाषांतर "सुसज्ज करणे" किंवा "सक्षम करणे" किंवा "शक्ती देणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: कलसै, दैवी, राज्य, प्रकाश, पौल, सोडवणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3581