mr_tw/bible/other/light.md

5.1 KiB

प्रकाश, ज्योती, दिवसाचा प्रकाश, सूर्यप्रकाश, संधिप्रकाश, प्रकाश पाडो, प्रकाशित

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये "प्रकाश" या शब्दाचे अनेक लाक्षणिक उपयोग आहेत. हे सहसा धार्मिकता, पवित्रता आणि सत्य यांचे रूपक म्हणून वापरले जाते. (पहा: रूपक

  • येशू म्हणाला, ''मी जगाचा प्रकाश आहे'' हे व्यक्त करण्यासाठी त्याने जगाकडे देवाचा खरा संदेश आणला आणि लोकांना त्यांच्या पापाच्या अंधकारापासून वाचवले.
  • ख्रिस्ती लोकांना "प्रकाशात चला" अशी आज्ञा देण्यात आली आहे, ज्याचा अर्थ त्यांना देवाची इच्छा आहे त्याप्रमाणे जीवन जगावे आणि दुष्टाई करणे टाळावे.
  • प्रेषित योहानाने म्हटले की "देव प्रकाश आहे" आणि त्याच्याठायी मुळीच अंधकार नाही.

प्रकाश आणि अंधार हे पूर्णपणे विरुद्ध आहेत. अंधार हा सर्व प्रकाशाचा अभाव आहे.

  • येशू म्हणाला की, "तो जगाचा प्रकाश आहे" आणि त्याच्या अनुयायांनी जगामध्ये प्रकाशाप्रमाणे प्रकाशमान होणे गरजेचे आहे, ज्यामध्ये अशा मार्गाने जीवन जगायला हवे की, ते स्पष्टपणे दर्शवेल की देव किती महान आहे.
  • "प्रकाशात चालणे" हे असे वागणे म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे, चांगले व योग्य ते करणे होय. अंधारात चालणे म्हणजे देवाविरुद्ध बंडखोरी करून जगणे आणि वाईट गोष्टी करणे होय.

भाषांतर सूचना

  • भाषांतर करताना, "प्रकाश" आणि "अंधार" हे जरी ते लाक्षणिकरित्या वापरले जात असले तरी ह्यांचा शब्दशः अर्थ ठेवणे महत्त्वाचे आहे.
  • कदाचित मजकूरामधील तुलना समजावून सांगणे आवश्यक असू शकते. उदाहरणार्थ, "प्रकाशाच्या मुलांप्रमाणे चालणे" ह्याचे भाषांतर, "उघडपणे धार्मिक जीवन जगणे, असा कोणीएक उज्ज्वल सूर्यप्रकाशात चालतो" असे केले जाऊ शकते.
  • "प्रकाश" या शब्दाचे भाषांतर एखादी वस्तू जी प्रकाश देते जसे की, दिवा ह्याचा संदर्भ देत नाही ह्याची खात्री करा. या शब्दाच्या भाषांतराने प्रकाशालाच संदर्भित केले पाहिजे.

(हे सुद्धा पहा: अंधार, पवित्र, धार्मिक, खरे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H216, H217, H3313, H3974, H4237, H5051, H5094, H5105, H5216, H6348, H7052, H7837, G681, G796, G1645, G2985, G3088, G5338, G5457, G5458, G5460, G5462