mr_tw/bible/kt/holy.md

10 KiB
Raw Permalink Blame History

पवित्र, पवित्रता, अपवित्र, समर्पित

व्याख्या:

"पवित्र" आणि "पवित्रता" या शब्दाचा संदर्भ देवाच्या संपूर्ण वैशिष्ठ्यांशी आहे, जो जे काही पापमय आणि अपरिपूर्ण आहे, त्यापासून बाजूला ठेवलेला आणि वेगळा केलेला आहे.

  • केवळ देव पूर्णपणे पवित्र आहे तो लोकांना आणि गोष्टींना पवित्र बनवतो.
  • जो मनुष्य पवित्र आहे, तो देवापासून आहे आणि त्याला देवाच्या गौरवासाठी, आणि त्याची सेवा करण्यासाठी वेगळे करण्यात आले आहे.
  • देवाने एखाद्या वस्तूला पवित्र असल्याचे घोषित केले, ती वस्तू देवाच्या उपयोगासाठी आणि गौरवासाठी वेगळी करण्यात येते, उदाहरणार्थ: वेदी, बलिदान अर्पण करण्याच्या हेतूने तिला वेगळे ठेवण्यात आले होते.
  • लोक त्याच्याकडे येऊ शकत नाहीत, जोपर्यंत तो त्यांना परवानगी देत ​​नाही, कारण तो पवित्र आहे आणि ते फक्त पापी आणि अपरिपूर्ण मनुष्य आहेत.
  • जुन्या करारामध्ये, देवाने याजकांना त्याची विशिष्ट सेवा करण्यासाठी पवित्र म्हणून वेगळे केले. देवाच्या जवळ जाण्यासाठी त्यांना शांत्यर्पण करून पापापासून शुद्धी करणे आवश्यक होते.
  • देवानेसुद्धा काही ठिकाणे आणि वस्तू जी त्याची होती किंवा जेथे त्याने स्वतःला प्रकट केले त्यांना पवित्र म्हणून वेगळे केले, जसे की त्याचे मंदिर.

शब्दशः, "अपवित्र" या शब्दाचा अर्थ "पवित्र नाही." हे एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा गोष्टींबद्दल सांगते ज्यामुळे देवाचा गौरव होत नाही.

  • हा शब्द देवाच्या विरोधात बंड करून त्याचा अनादर करणाऱ्या अशा एकाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.
  • "अपवित्र" अशी म्हंटली जाणारी एक गोष्ट सामान्य, अपवित्र किंवा अशुद्ध अशी असू शकते. ते देवापासून नसतात.

"समर्पित" या शब्दाचा अर्थ, देवाची उपासना करण्याशी किंवा खोट्या देवांची मूर्तिपूजक उपासना करण्यासाठी संबंधित असलेल्या गोष्टींचे वर्णन करतो.

  • जुना करारामध्ये, "समर्पित" या शब्दाचा अर्थ खोट्या देवतांच्या उपासनेत वापरलेला परवानाकृत दगड खांब व इतर वस्तू यांचे वर्णन करण्याकरिता होतो. हे "धार्मिक" म्हणून देखील भाषांतरित केले जाऊ शकते.
  • "समर्पित गाणी" आणि "समर्पित संगीत" यांचा संदर्भ संगीत जे देवाच्या महिमेसाठी गाईले किंवा वाजवले गेले याच्याशी आहे. ह्याचे भाषांतर "यहोवाची उपासना करण्यासाठी संगीत" किंवा "देवाची स्तुती करणारे गीत" असे केले जाऊ शकते.
  • "समर्पित कर्तव्ये" हा शब्द "समर्पित जबाबदाऱ्या" किंवा "समर्पित विधी" या वाक्यांशाचा संदर्भ याजकाने देवाची उपासना करण्याकरिता लोकांचे नेतृत्व करण्याशी आहे. हा शब्द मूर्तिपूजक याजकाने खोट्या दैवतांची उपासना करण्यासाठी केलेल्या विधींसाठी देखील वापरला जाऊ शकतो

भाषांतर सूचना

  • "पवित्र" या शब्दाचे भाषांतर "देवासाठी वेगळा केलेला" किंवा "देवाचे असणे" किंवा "पूर्णपणे शुद्ध" किंवा "पूर्णपणे पापरहित" किंवा "पापांपासून विभक्त" अशा मार्गांनी केले जाऊ शकते.
  • "पवित्र बनण्यासाठी" इंग्रजीमध्ये सहसा "पवित्र करणे" असे भाषांतरित केले जाते. याचे भाषांतर "(एखाद्याला) देवाच्या वैभवासाठी वेगळे केलेला" असे करता येईल.
  • "अपवित्र" या शाचे भाषांतर "पवित्र नाही" किंवा "देवाचे नाही" किंवा "देवाचे गौरव करत नसलेला" किंवा "देवाच्या भक्तीत रमलेला नाही" अशा पद्धतींनी देखील करता येईल.
  • काही संदर्भांत, "अपवित्र" हा शब्द "अशुद्ध" म्हणून भाषांतरित केला जाऊ शकतो.

(हे सुद्धा पाहा: पवित्र आत्मा, पवित्र करणे, पवित्र करणे, वेगळा केलेला)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 01:16 देवाने सातव्या दिवसाला आशीर्वादित करुन पवित्र ठरविले कारण त्या दिवशी त्याने आपल्या कामापासून विश्रांती घेतली.
  • 09:12 कारण तू पवित्र भूमीवर उभा आहेस."
  • 13:01 देव मोशेला व इस्राएल लोकांस म्हणाला, "जर तुम्ही माझी आज्ञा व माझा करार पाळाल, तर तुम्ही माझे खास निवडलेले लोक व्हाल, राजकीय याजकगण व पवित्र राष्ट्र असे व्हाल."
  • 13:05 शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ.
  • 22:05 यास्तव ते बाळ पवित्र, देवाचा पुत्र असेल.
  • 50:02 आपण येशूच्या येण्याची वाट पहात असतांना देवाची अशी इच्छा आहे की आपण पवित्र व त्याचा आदर करणारे जीवन जगावे.

Strong's

  • Strong's: H430, H2455, H2623, H4676, H4720, H6918, H6922, H6942, H6944, H6948, G37, G38, G39, G40, G41, G42, G462, G1859, G2150, G2412, G2413, G2839, G3741, G3742