mr_tw/bible/other/profit.md

5.0 KiB

फायदा, लाभ, उपयोगी (फायदेशीर), निरुपयोगी

व्याख्या:

सर्वसाधारणपणे, "फायदा" आणि "उपयोगी" या संज्ञा काही विशिष्ट कृती किंवा वर्तणूक करण्याद्वारे काहीतरी चांगले मिळवणे आहे.

काहीतरी एखाद्यासाठी "उपयोगी" आहे, जर त्याने त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आणली किंवा जर त्यांने इतर लोकांसाठी चांगल्या गोष्टी आणण्यास मदत होते.

  • अधिक विशेषतः, "फायदा" हा शब्द सहसा व्यवसायातून प्राप्त झालेल्या पैशांचा उल्लेख आहे. एखादा व्यवसाय "फायदेशीर" आहे जर त्याने खर्च केलेल्या पैश्यापेक्षा जास्त पैसे मिळवून दिले.
  • जर त्यांनी लोकांसाठी चांगल्या गोष्टी आणल्या, तर क्रिया फायदेशीर आहेत.
  • तीमाथ्याला दुसरे पत्र 3:16 असे म्हणते की, सर्व वचने चुका सुधारण्यास आणि धर्मिकतेमध्ये लोकांना शिकवण्यास "उपयोगी" आहेत. ह्याचा अर्थ असा आहे की, पवित्र शास्त्राचे शिक्षण देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी लोकांना शिकवण्यासाठी उपयुक्त आणि उपयोगी आहेत.

"निरुपयोगी" या शब्दाचा अर्थ उपयोगी नसलेला असा होतो.

  • ह्याचा शब्दशः अर्थ काहीही फायदा नसणे किंवा एखाद्याला काहींही मिळवण्यासाठी मदत न करणे असा होतो.
  • असे काही जे निरुपयोगी आहे, ते करणे फायद्याचे नाही, कारण ते काहीही लाभ करून देणार नाही.
  • ह्याचे भाषांतर "निरुपयोगी" किंवा "शुल्लक" किंवा "उपयोगी नसलेला" किंवा "काहीही फायदा न देणारा" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: योग्यतेचा)

भाषांतर सूचना

  • संदर्भाच्या आधारावर, "फायदा" या शब्दाचे भाषांतर "लाभ" किंवा "मदत" किंवा "प्राप्त करणे" असे केले जाऊ शकते.
  • "फायदेशीर" या शब्दाचे भाषांतर "उपयोगी" किंवा "लाभदायक" किंवा "उपयुक्त" असे केले जाऊ शकते.
  • कश्यापासून तरी "फायदा" ह्याचे भाषांतर "च्या पासून लाभ" किंवा "च्या पासून पैसे मिळवणे" किंवा "ची मदत प्राप्त करणे" असे केले जाऊ शकते.
  • व्यवसायाच्या संदर्भात "फायदा" ह्याचे भाषांतर "पैसे मिळवणे" किंवा "अतिरक्त पैसे" किंवा "जास्तीचे पैसे" या अर्थाच्या शब्दाने किंवा वाक्यांशाने केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1215, H3148, H3276, H3504, H4195, H4768, H5532, H7737, H7939, G147, G255, G512, G888, G889, G890, G1281, G2585, G2770, G2771, G3408, G4297, G4298, G4851, G5539, G5622, G5623, G5624