mr_tw/bible/kt/worthy.md

4.5 KiB

योग्य, किमतींचा, अयोग्य (लायक नसलेले), नालायक

व्याख्या:

"योग्य" हा शब्द एखादा व्यक्ती किंवा एखादी गोष्ट आदराच्या किंवा सन्मानाच्या लायक असल्याचे वर्णन करते. "किमतीचा असणे" ह्याचा अर्थ मोल्यवान किंवा महत्वाचा असा होतो. "नालायक" या शब्दाचा अर्थ काहीही किंमत नसलेला असा होतो.

  • योग्य असणे हे मोल्यवान असणे किंवा महत्वाचा असणे ह्याच्याशी संबंधित आहे.
  • "अयोग्य" असणे ह्याचा अर्थ विशेष लक्ष देण्याच्या लायकीचा नसणे, असा होतो.
  • योग्य नाही असे वाटणे म्हणजे दुसऱ्या एखाद्यापेक्षा कमी महत्वाचे वाटणे किंवा सन्मानाच्या किंवा दयाळूपानाच्या योग्यतेचा नाही असे वाटणे.
  • "अयोग्य" हा शब्द आणि "नालायक" हा शब्द हे संबंधित आहेत, पण त्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत. * "अयोग्य" असणे ह्याचा अर्थ कोणताही सन्मान किंवा मान्यतेच्या लायकीचा नसणे, असा होतो. "नालायक" या शब्दाचा अर्थ काहीही हेतू किंवा किंमत नसलेला असा होतो.

भाषांतर सूचना

  • "योग्य" ह्याचे भाषांतर "लायकीचा" किंवा "मोल्यवान" असे केले जाऊ शकते.
  • "किमतीचा" या शब्दाचे भाषांतर "किंमत" किंवा "महत्व " असे केले जाऊ शकते.
  • "योग्य असणे" या वाक्यांशाचे भाषांतर "मोल्यवान असणे" किंवा "महत्वाचा असणे" असे देखील केले जाऊ शकते.
  • "च्या पेक्षा अधिक किमतीचा" या वाक्यांशाचे भाषांतर "च्या पेक्षा अधिक मौल्यवान" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भाच्या आधारावर, "अयोग्य" या शब्दाचे भाषांतर "महत्वाचा नसलेला" किंवा "तिरस्करणीय" किंवा "अपात्र" असे केले जाऊ शकते.
  • "नालायक" या शब्दाचे भाषांतर "काहीही किंमत नसलेला" किंवा "हेतू नसलेला" किंवा "कश्याच्याही योग्य नसलेला" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: सन्मान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H117, H639, H1929, H3644, H4242, H4373, H4392, H4592, H4941, H6994, H7939, G514, G515, G516, G2425, G2661, G2735