mr_tw/bible/other/profane.md

2.4 KiB

अमंगळ (भ्रष्ट), दुषित, कलंक लावणे

व्याख्या:

एखाद्या गोष्टीला अमंगळ करणे म्हणजे, ती गोष्ट मलीन होईल, प्रदूषित होईल अशा पद्धतीने वागणे किंवा जी गोष्ट पवित्र आहे तिचा अनादर करणे.

  • एक भ्रष्ट मनुष्य हा असा असतो, जो अशा पद्धतीने वागतो, जे देवाच्या दृष्टीने अपवित्र आणि देवाचा अनादर करणारे असते.
  • "अमंगळ" या क्रियापदाचे भाषांतर, "अपवित्र असे वागवणे" किंवा "च्या प्रती अनादर असणे" किंवा "अनादर करणे" असे केले जाऊ शकते.
  • देवाने इस्राएली लोकांना सांगितले की, त्यांनी मूर्तीबरोबर स्वतःला "दुषित" केले आहे, ह्याचा अर्थ ते लोक पाप करून स्वतःला "अशुद्ध" किंवा "तुच्छ" बनवत होते. ते देवाचासुद्धा अनादर करीत होते.
  • संदर्भाच्या आधारावर, "अमंगळ" या विशेषणाचे भाषांतर, "अनादर करणे" किंवा "देवहीन" किंवा "अपवित्र" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: मलीन, पवित्र, शुद्ध)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2455, H2490, H2491, H2610, H2613, H5234, H8610, G952, G953