mr_tw/bible/other/precious.md

2.5 KiB

मौल्यवान

तथ्य:

"मौल्यवान" हा शब्द अशा लोकांचे किंवा वस्तूचे वर्णन करतो, ज्या अतिशय किमती समजल्या जातात.

  • "मौल्यवान खडे" किंवा "मौल्यवान हिरे" ह्यांचा संदर्भ रंगीबेरंगी असलेल्या खडकांशी आणि खानिजांशी येतो, किंवा त्यांच्याकडे असलेले इतर गुण जे त्यांना सुंदर किंवा उपयुक्त करतात.
  • मौल्यवान खड्यांच्या उदाहरमध्ये, हिरे, माणके आणि पाचू ह्यांचा समावेश होतो.
  • सोने आणि चांदी ह्यांना "मौल्यवान धातू" असे म्हंटले जाते.
  • यहोवा म्हणतो की, त्याचे लोक त्याच्या नजरेमध्ये "मौल्यवान" आहेत (यशाया 43:4).
  • पेत्र असे लिहितो की, सौम्य आणि शांत आत्मा देवाच्या नजरेमध्ये मौल्यवान आहे (पेत्राचे पहिले पत्र 3:4).
  • या शब्दाचे भाषांतर "बहुमोल" किंवा "अतिशय प्रिय" किंवा "महत्वाचा" किंवा "अत्यंत किमतीचा" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: सोने, चांदी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H68, H1431, H2532, H2580, H2667, H2896, H3357, H3365, H3366, H3368, H4022, H4030, H4261, H4262, H4901, H5238, H8443, G927, G1784, G2472, G4185, G4186, G5092, G5093