mr_tw/bible/other/oppress.md

4.0 KiB

जुलूम करणे, जुलूम केला (छळ होणे), हिंसेनी भरलेला, जुलुम (दडपशाही), जुलूमशाही (अत्याचारी), जुलूम करणारा, जुलूम करणारे

व्याख्या:

"जुलूम करणे" आणि "दडपशाही" या शब्दांचा संदर्भ, लोकांना निष्ठुरपणे वागवण्याशी येतो. एक "जुलूम करणारा" हा असा मनुष्य आहे, जो लोकांवर जुलूम करतो.

  • "जुलूमशाही" या शब्दाचा विशेषकरून संदर्भ अशा परिस्थितीशी येतो, जिथे ज्यादा ताकदीचे लोक, त्यांच्या सत्तेच्या खाली किंवा शासनाच्या खाली असलेल्या लोकांशी गैरवर्तण करतात किंवा त्यांना गुलाम बनवतात.
  • "छळ झाला" हा शब्द अशा लोकांचे वर्णन करतो, ज्यांना निष्ठुरपणे वागवण्यात आले आहे.
  • बऱ्याचदा शत्रू राष्ट्रे आणि त्यांचे राजे हे इस्राएली लोकांवर जुलूम करणारे होते.

भाषांतर सूचना:

  • संदर्भावर आधारित, "जुलूम करणे" ह्याचे भाषांतर "गंभीरपणे गैरवर्तणूक" किंवा "अतिशय ओझ्यास कारणीभूत होणे" किंवा "दयनीय बंधानाखाली ठेवणे" किंवा "निष्ठुरपणे शासन करणे" असे केले जाऊ शकते.
  • "दडपशाही" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "प्रचंड दडपशाही आणि बंधने" किंवा "अतिशय जड नियंत्रण" ह्यांचा समावेश होतो.
  • "छळ झालेला" या वाक्यांशाचे भाषांतर "छळ झालेले लोक" किंवा "भयानक बंधनात असलेले लोक" किंवा "निष्ठुरपणे वागणूक मिळालेले लोक" असे केले जाऊ शकते.
  • "जुलूम करणारा" या शब्दाचे भाषांतर "असा व्यक्ती जो जुलूम करतो" किंवा "असे राष्ट्र जे निष्ठुरपणे नियंत्रण आणि शासन करते" किंवा "छळ करणारा" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: बंधन, गुलाम, छळ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1790, H1792, H2541, H2555, H3238, H3905, H3906, H4642, H4939, H5065, H6115, H6125, H6184, H6206, H6216, H6217, H6231, H6233, H6234, H6693, H7429, H7533, H7701, G2616, G2669