mr_tw/bible/other/enslave.md

3.7 KiB

गुलाम होणे, गुलाम होतील, गुलाम झाले, बंधन, दास्यात, बंधने, बांधलेला

व्याख्या:

एखाद्याला "गुलाम बनवणे" ह्याचा अर्थ त्या व्यक्तीला त्याच्या स्वामीची किंवा शासन करणाऱ्या देशाची सेवा करण्याची सक्ती करणे असा होतो. "गुलाम असणे" किंवा "बंधनात असणे" ह्याचा अर्थ एखाद्या वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या नियंत्रणात असणे असा होतो.

  • एक व्यक्ती जो गुलाम झाला आहे, किंवा बंधनात आहे, त्याने इतरांची सेवा कोणत्याही मोबदल्याशिवाय केली पाहिजे, त्याला जे वाटते, तो ते करण्यास मुक्त नाही.
  • "गुलाम बनवणे" ह्याचा अर्थ त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावून घेणे असा देखील होतो.
  • "बंधनात असणे" ह्याच्यासाठीचा दुसरा शब्द "गुलामी" असा देखील होतो.
  • लाक्षणिक अर्थाने, मनुष्य प्राणी हे पापाच्या "गुलामीत आहेत" जो पर्यंत येशू त्यांना पापाच्या नियंत्रणातून आणि सामर्थ्यातून बाहेर काढत नाही.
  • जेंव्हा एखादा व्यक्ती ख्रिस्तामध्ये नवीन जीवन स्वीकारतो, तेंव्हा तो पापाचा गुलाम बनण्याचे सोडून, नितीमत्वाचा गुलाम बनतो.

भाषांतर सूचना:

  • "गुलाम होणे" या शब्दाचे भाषांतर "मुक्त होऊ शकत नाही" किंवा "इतरांची सेवा करण्याची सक्ती करणे" किंवा "इतरांच्या नियंत्रणाखाली ठेवणे" असे केले जाऊ शकते.
  • "चा गुलाम होणे" किंवा "च्या बंधनात असणे" या शब्दांचे भाषांतर, "चा गुलाम होण्यास सक्ती करणे" किंवा "सेवा करण्याची सक्ती करणे" किंवा "च्या नियंत्रणाखाली असणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: मुक्त, नीतिमान, सेवक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3533, H5647, G1398, G1402, G2615