mr_tw/bible/other/oath.md

5.3 KiB

शपथ, शपथेमुळे, शपथ वाहणे, शपथ घेतली, शपथा वाहणे, ची शपथ वाहणे, ची शपथ घेणे

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये, शपथ एक औपचारिक वचन आहे जो व्यक्ती शपथ घेत आहे त्याने ते वचन पूर्ण करणे गरजेचे आहे. शपथेमध्ये विश्वासू आणि सत्य राहण्याची वचनबद्धता असते.

  • एखाद्या न्यायालयात, एक साक्षीदार नेहमीच शपथ घेऊन वचन देतो, की तो जे काही सांगेल ते खरे आणि वास्तविक असेल.
  • पवित्र शास्त्रामध्ये, "शपथ वाहणे" ह्याचा अर्थ शपथ बोलून दाखवणे असा होतो.
  • "ची शपथ घेणे" या शब्दाचा अर्थ, ज्याच्या आधारावर किंवा ताकतीवर शपथ घेतली आहे त्या कश्याच्या किंवा कोणाच्या तरी नावाचा उपयोग करणे असा होतो.
  • कधीकधी या संज्ञा एकत्र वापरल्या जातात जसे "शपथ घेऊन शपथ वाहा."
  • अब्राहम आणि अबीमलेख यांनी आपसात विहिरीच्या उपयोगाच्या संदर्भात करार करून शपथ वाहिली.
  • अब्राहामाने त्याच्या सेवकाला शपथ घ्यायला (औपचारिक वचन) सांगितले, की तो त्याचा मुलगा इसहाक ह्याच्यासाठी बायको म्हणून, अब्राहमाच्या नातेवाईकांमधील कोणीतरी एक शोधेल.
  • देवाने सुद्धा शपथ वाहिली, ज्या मध्ये त्याने त्याच्या लोकांना वचन दिले.
  • "शपथ वाहणे" या शब्दाचा आधुनिक दिवसांचा अर्थ "घाणेरडी भाषा वापरणे" असा होतो. ह्याचा पवित्र शास्त्रातील अर्थ हा नव्हे.

भाषांतर सूचना

  • संदर्भावर आधारित, "शपथ" हा शब्द "प्रतिज्ञा" किंवा "एक गंभीर वचन" म्हणून सुद्धा भाषांतरित केला जाऊ शकतो.
  • "शपथ वाहणे" ह्याचे भाषांतर "औपचारिक वचन"किंवा प्रतिज्ञा करणे" किंवा "काहीतरी करण्याचा शब्द देणे" असे केले जाऊ शकते.
  • "माझ्या नावाची शपथ घेऊन सांगतो" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "त्याची खात्री करण्यासाठी माझे नाव वापरून वचन देणे" ह्याचा समावेश होतो.
  • "पृथ्वीची आणि स्वर्गाची शपथ घेणे" ह्याचे भाषांतर "स्वर्ग आणि पृथ्वी ह्याची पृष्टी करतील असे म्हणून काहीतरी करण्याचे आश्वासन देणे" असे केले जाऊ शकते.
  • "शपथ वाहणे" आणि "शपथ" ह्यांच्या भाषांतराचा संदर्भ पापाशी येणार नाही, ह्याची खात्री करा. पवित्र शास्त्रामध्ये, याचा अर्थ असा नाही.

(हे सुद्धा पहा: अबीमलेख, करार, नवस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H422, H423, H3027, H5375, H7621, H7650, G332, G3660, G3727, G3728