mr_tw/bible/names/abimelech.md

2.7 KiB

अबीमलेख

तथ्य:

ज्यावेळी अब्राहाम व इसहाक हे कनान देशात राहत होते, त्यावेळी अबीमलेख हा पलीष्ट्यांच्या गरार राज्याचा राजा होता.

  • अब्राहामाने अबीमलेखला असे सांगून फसवले की सारा त्याची बायको नव्हे तर त्याची बहीण आहे.
  • अब्राहाम आणि अबीमलेखाने बैर-शेबा येथे विहिरीच्या मालकी हक्काविषयीचा करार केला.
  • बऱ्याच वर्षांनंतर इसहाकाने अबीमलेख आणि गरारमधील इतर माणसे यांना फसवून खंबीरपणे सांगितले की रिबका ही त्याची बायको नव्हे तर त्याची बहिण आहे.
  • अबीमलेख राजाने आधी अब्राहामला आणि नंतर इसहाकाला त्याच्याशी खोटे बोलण्याबद्दल दोष दिला.
  • अजून एक अबीमलेख नावाचा पुरुष होता जो गीदोनाचा मुलगा आणि योथानाचा भाऊ होता. काही भाषांतरे नावामाधील शब्द लेखनामध्ये (स्पेलिंगमध्ये) थोडासा बदल करून स्पष्ट करतात की तो अबीमलेख राजापासून वेगळा आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बैर-शेबा, गरार, गिदोन, योथाम, पालीष्टी)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H40