mr_tw/bible/other/mind.md

4.3 KiB

मन, मने, मनाचे, जाणीव असलेला (विचार करणे), स्मरण करणे, आठवण होणे, स्मारक चिन्ह, समान वृत्तीचा

व्याख्या:

"मन" या शब्दाचा संदर्भ एखाद्या मनुष्याच्या भागाशी आहे, जे विचार करत आणि निर्णय घेत.

  • प्रत्येक व्यक्तीचे मन हे त्याच्या किंवा तिच्या विचारांची आणि तर्कांची बेरीज असते.
  • "ख्रिस्ताचे मन असणे" ह्याचा अर्थ जसा येशू ख्रिस्ताने विचार केला आणि कार्य केले तसाच विचार आणि कार्य करणे असा होतो. ह्याचा अर्थ देव जो पिता त्याची आज्ञा पाळणे, ख्रिस्ताची शिकवण पाळणे, आणि हे सर्व पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या सहाय्याने करण्यास सक्षम होणे असा होतो.
  • "त्याचे मन बदलणे" ह्याचा अर्थ आधी जे होत त्यापेक्षा एखाद्याने वेगळा निर्णय घेतला किंवा त्याचे मत वेगळे झाले.

भाषांतर सूचना

  • "मन" या शब्दाचे भाषांतर "विचार" किंवा "तर्क" किंवा "मनन" किंवा "समजूत" असे केले जाऊ शकते.
  • "मनात ठेवा" या अभिव्यक्तीचे भाषांतर "लक्षात ठेवा" किंवा "ह्याकडे ध्यान द्या" किंवा "हे माहित असल्याची खात्री करा" असे केले जाऊ शकते.
  • "हृदय, आत्मा आणि मन" या अभिव्यक्तींचे भाषांतर "तुम्हाला काय वाटते, तुम्ही कशावर विश्वास करता, आणि तुम्ही त्याच्याबद्दल काय विचार करता" असे देखील केले जाऊ शकते.
  • "मनात ठेवा" या अभिव्यक्तींचे भाषांतर "लक्षात ठेवा" किंवा "च्या बद्दल विचार करा" असे केले जाऊ शकते.
  • "त्याने त्याचे मन बदलले आणि गेला" या अभिव्यक्तीचे भाषांतर "वेगळा निर्णय घेतला आणि गेला" किंवा "सर्वानंतर जाण्याचा निर्णय घेतला" किंवा "त्याने त्याचे मत बदलले आणि गेला" असे केले जाऊ शकते.
  • "दुहेरी-मनाचा" या अभिव्यक्तीचे भाषांतर "संशय घेणारा" किंवा "निर्णय घेण्यास सक्षम नसलेला" किंवा "विवादित विचारांसह असलेला" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: विश्वास, हृदय, आत्मा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3629, H3820, H3824, H5162, H7725, G1271, G1374, G3328, G3525, G3540, G3563, G4993, G5590