mr_tw/bible/kt/soul.md

3.6 KiB

जीव

व्याख्या:

जीव एखाद्या व्यक्तीच्या आतील, अदृश्य आणि चिरंतन भाग आहे. ह्याचा संदर्भ मनुष्याच्या भौतिक नसलेल्या भागाशी आहे.

  • "जीव" आणि "आत्मा" या कदाचित दोन वेगवेगळ्या संकल्पना असतील किंवा कदाचित या दोन संज्ञा असतील ज्यांचा संदर्भ एकाचा संकल्पनेशी आहे.
  • जेव्हा एखादा माणूस मरतो तेव्हा त्याचा जीव त्याच्या शरीरातून बाहेर पडतो.
  • काहीवेळा "जिव" हा शब्द लाक्षणिक अर्थाने त्या सम्पूर्ण मनुष्याला संदर्भित करण्यासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ "जो जीव पाप करतो" ह्याचा अर्थ "जो व्यक्ती पाप करतो" आणि "माझा जीव थकला आहे" ह्याचा अर्थ "मी थकलो आहे" असा होतो.

भाषांतर सूचना

  • "जीव" या शब्दाचे भाषांतर "आतील स्वरूप" किंवा "आतील व्यक्ती" असे केले जाऊ शकते.
  • काही संदर्भांत, "माझा जीव" ह्याचे भाषांतर "मी" किंवा "मला" असे केले जाऊ शकते.
  • सद्नार्भावर आधारित, "आत्मा" या शब्दाचे भाषांतर "व्यक्ती" किंवा "तो" किंवा "त्याला" असेही करता येऊ शकते.
  • काही भाषांमध्ये कदाचित "जीव" आणि "आत्मा" ह्यासाठी फक्त एकाच शब्द असू शकतो.
  • इब्री लोकांस पत्र 4:12 मध्ये, "जीव व आत्मा विभक्त होणे" या शब्दाचा अर्थ "अंतःकरणातील व्यक्तीला गंभीरपणे समजून घेणे किंवा उघड करणे" असा होऊ शकतो.

(हे सुद्धा पहा: आत्मा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H5082, H5315, H5397, G5590