mr_tw/bible/other/melt.md

3.6 KiB

पाणीपाणी होणे (वितळणे), वितळून जाणे, वितळते, ओतीव (वितळवून)

तथ्य:

"वितळणे" या शब्दाचा संदर्भ अशा गोष्टीशी आहे जे गरम केले असता द्रव बनते. ह्याचा उपयोग लाक्षणिक पद्धतीने देखील केला जातो. एखादी गोष्ट जी वीतळवली आहे तिचे वर्णन "ओतीव" असे केले जाते.

  • वेगवेगळ्या प्रकारचे धातू ते वितळेपर्यंत तापवले जातात आणि ते शस्त्रे किंवा मूर्ती अशा गोष्टी बनवण्यासाठी साच्यात ओतले जातात. "वितळवलेला धातू" या अभिव्यक्तीचा संदर्भ धातुशी आहे, ज्याला वितळवले आहे.
  • जशी मेणबत्ती जळत जाते, त्याचे मेन वितळते आणि खाली गळते. प्राचीन काळी, सहसा पत्रांना सीलबंद करण्यासाठी त्याच्या कोपरावरती थोड्या प्रमाणात वितळवलेले मेन टाकण्यात येत होते.
  • "वितळणे" ह्याच्या लाक्षणिक उपयोगाचा अर्थ मऊ आणि कमकुवत बनणे, जसे की वितळलेले मेन असा होतो.
  • "त्यांची हृदये वितळली" या अभिव्यक्तीचा अर्थ भीतीमुळे ते खूपच कमकुवत बनले असा होतो.
  • "ते वितळून जातील" या अजून एका अभिव्यक्तीचा अर्थ त्यांना दूर जाण्यास भाग पडले जाईल किंवा ते कमकुवत आहेत असे दाखवले जाईल आणि पराभवामध्ये निघून जातील असा होतो.
  • "वितळणे" या शब्दाच्या शब्दशः अर्थाचे भाषांतर, "द्रव बनणे" किंवा "द्रवरूप होणे" किंवा "द्रव होण्यास कारणीभूत होणे" असे केले जाऊ शकते.
  • "वितळणे" ह्याच्या लाक्षणिक अर्थाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "मऊ बनणे" किंवा "कमकुवत बनणे" किंवा "पराभूत असणे" ह्यांचा समावेश केला जाऊ शकतो.

(हे सुद्धा पहा: हृदय, खोटे देव, शिक्का)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1811, H2003, H2046, H3988, H4127, H4529, H4541, H4549, H5140, H5258, H5413, H6884, H8557, G3089, G5080