mr_tw/bible/other/lots.md

4.5 KiB

चिठ्ठ्या, चिठ्ठ्या टाकणे

व्याख्या:

"चिठ्ठी" एक चिन्हांकित वस्तू आहे, जी काही निर्णय घेण्याचा एक मार्ग म्हणून इतर समान वस्तूंमधून एक म्हणून निवडली जाते. "चिठ्ठ्या टाकणे" ह्याचा संदर्भ चिन्हांकित वस्तू जमिनीवर किंवा इतर पृष्ठभागावर उडवण्याशी आहे.

  • बऱ्याचदा चिठ्ठ्या या छोटे चिन्हांकित केलेले दगड किंवा तुटलेल्या मातीच्या भांड्याचे तुकडे होत.
  • काही संस्कृती पेंढ्यातील काड्यांचा गुच्छा वापरून त्यातून चिठ्ठ्या "काढतात" किंवा "बाहेर ओढतात" कोणीतरी पेंढ्यातील कड्या धरून ठेवत म्हणजे दुसऱ्या कोणालाही त्या किती लांब आहेत हे दिसत नव्हते. प्रत्येकजण एक काडी ओढत असे आणि जो कोणी सर्वात मोठी काडी (किंवा सर्वात छोटी काडी) ओढेल तो निवडलेला असे.
  • देवाची इस्राएल लोकांच्याबद्दल काय इच्छा आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकण्याच्या सवयीचा उपयोग केला.
  • जसे की जखऱ्या आणि अलीशिबेच्या काळात, मंदिरातील विशिष्ठ वेळेची विशिष्ठ जबाबदारी कोणता याजक पार पाडेल हे ठरवण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग केला.
  • ज्या सैनिकांनी येशूला वधस्तंभावर खिळले, त्यांनी येशूचा झगा कोणाला मिळावा ह्याचा निर्णय करण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या.
  • "चिठ्ठ्या टाकणे" या वाक्यांशाचे भाषांतर "चिठ्ठ्या उडवणे" किंवा "चिठ्ठ्या काढणे" किंवा "चिठ्ठ्या लोटणे" असे केले जाऊ शकते. "टाकणे" या शब्दाचे भाषांतर करताना, ते बऱ्याच लांब अंतरावर फेकले जाते असा भास होत नाही ह्याची खात्री करा.
  • संदर्भावर आधारित, "चिठ्ठी" या शब्दाचे भाषांतर "चिन्हांकित दगड" किंवा "मातीच्या मडक्याचे तुकडे" किंवा "काठी" किंवा गवताच्या काडीचा तुकडा" असे केले जाऊ शकते.
  • जर निर्णय "चिठ्ठ्यांनी" घेतला असेल तर, त्याचे भाषांतर "चिठ्ठ्या काढून (किंवा टाकून)" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: अलिशिबा, याजक, जखऱ्या)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1486, H2256, H5307, G2624, G2819, G2975, G3091