mr_tw/bible/other/learnedmen.md

2.9 KiB

ज्ञानी, ज्योतिषी

व्याख्या:

मत्तयाच्या पुस्तकातील ख्रिस्ताच्या जन्माच्या अहवालात, "शिकलेले" किंवा "शिक्षित" मनुष्य हे "ज्ञानी लोक" होते, ज्यांनी येशूच्या जन्मानंतर काही वेळात येशुसाठी बेथलेहेमात भेटवस्तू आणल्या. ते कदाचित "ज्योतिषी" असावेत, असे लोक जे ताऱ्यांचा अभ्यास करतात.

  • हे लोक इस्रायेलाच्या पूर्वेस असणाऱ्या दूरच्या देशातून प्रवास करून आले होते. ते कोठून आले होते किंवा ते कोण होते ह्याच्याबद्दल अचूक माहिती उपलब्ध नाही. पण ते साहजिक विद्वान होते, जे ताऱ्यांचा अभ्यास करत होते.
  • कदाचित ते लोक ज्ञानी लोकांचे वंशज असावेत ज्यांनी दनीएलाच्या काळात बाबेली राजाची सेवा केली आणि त्यांनी अनेक वस्तूंचे प्रशिक्षण दिले, ज्यामध्ये ताऱ्यांचा अभ्यास करणे आणि स्वप्नांचा अर्थ सांगणे ह्याचा समावेश होतो.
  • पारंपारिकदृष्ट्या असे म्हंटले जाते की तेथे तीन ज्ञानी मनुष्य किंवा शिक्षित लोक असावेत, त्याचे कारण त्यांनी येशुसाठी आणलेल्या तीन भेटवस्तू होत्या. तथापि, तेथे किती लोक होते, ह्याबद्दल पवित्र शास्त्र काहीही सांगत नाही.

(हे सुद्धा पहा: बाबेल, बेथलेहेम, दनीएल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1505, G3097