mr_tw/bible/other/horse.md

2.4 KiB

घोडा, घोडे, युद्धातील घोडा, युद्धातील घेडे, घोड्यावर (घोड्याची पाठ)

व्याख्या:

एक घोडा हा मोठा, चार-पायांचा प्राणी आहे, ज्याला पवित्र शास्त्राच्या काळात बऱ्याचदा शेतीतील कामे आणि लोकांची वाहतूक करण्यासाठी वापरले जात होते.

  • काही घोड्यांचा उपयोग गाडी किंवा रथ ओढण्यासाठी केला जात होता, तर इतरांचा उपयोग एकटा स्वार वाहून नेण्यासाठी केला जात होता.
  • घोडे अनेकदा त्यांच्या डोक्यावर लहान तुकडा आणि लगाम घालतात, जेणेकरुन त्यांचे मार्गदर्शन करता येईल.
  • पवित्र शास्त्रात, घोड्यांना मौल्यवान संपत्ती मानले जाई, आणि ते संपत्ती मोजण्याचे एक साधन होते, मुख्यत्वेकरून त्यांचा युद्धातील उपयोग. उदाहरणार्थ, शलमोन राजाच्या महान वैभवातील एक भाग म्हणजे, त्याच्याकडे असणारे, हजारो घोडे आणि रथ.
  • घोड्याच्या समान असणारे प्राणी, गाढव आणि खेचर हे होत.

(हे सुद्धा पहाः रथ, गाढव, शलमोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H47, H5483, H5484, H6571, H7409, G2462