mr_tw/bible/other/drunk.md

2.3 KiB

प्यालेला (धुंद झालेला), पिणारा

तथ्य:

"धुंद झालेला" या शब्दाचा अर्थ जास्त प्रमाणामध्ये मद्यक पेय पिल्यामुळे उन्मत झालेला असा होतो.

  • एक "पिणारा" हा असा मनुष्य आहे, जो नियमित पीत असतो. अशा प्रकारच्या मनुष्याला "मद्यपी" म्हणून सुद्धा संदर्भित केले जाते.
  • पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की, विश्वासणारे मादक पेयाने धुंद झालेले नसावेत, परंतु पवित्र आत्म्याने नियंत्रित केलेले असावेत.
  • पवित्र शास्त्र आपल्याला शिकवते की, नशा करणे अयोग्य आहे आणि हे एखाद्या व्यक्तीस इतर मार्गांनी पाप करावयास प्रभावित करते.
  • "प्यालेला" चे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "तर्र" किंवा "उन्मत" किंवा "जास्त मद्य प्यालेला" किंवा "आंबलेल्या पेयाने धुंद झालेला" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पाहा: द्राक्षरस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H5433, H5435, H7301, H7302, H7910, H7937, H7941, H7943, H8354, H8358, G3178, G3182, G3183, G3184, G3630, G3632