mr_tw/bible/other/doctrine.md

2.1 KiB

शिकवण

व्याख्या:

"शिकवण" या शब्दाचा शब्दशः अर्थ "शिक्षण" असा होतो. ह्याचा सहसा संदर्भ धार्मिक शिक्षणाशी आहे.

  • ख्रिस्ती शिक्षणाच्या संदर्भात, "शिकवण" ह्याचा संदर्भ देवाबद्दलच्या सर्व शिक्षणाशी आहे - पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा - ज्यामध्ये त्याच्या सर्व चरित्र गुणांचा आणि त्याने केलेल्या कार्यांचा समावेश होतो.
  • ह्याचा संदर्भ देव ख्रिस्ती लोकांना, पवित्र जीवन जगण्याद्वारे कसे देवाचे गौरव करावे, ह्याबद्दल जे काही शिकवतो त्याच्याशी आहे.
  • "शिकवण" या शब्दाचा उपयोग, कधीकधी चुकीच्या किंवा जगिक धार्मिक शिक्षणाच्या संदर्भात सुद्धा येतो, जे मनुष्यांकडून आले आहे. संदर्भ त्याचा अर्थ स्पष्ट करतो.
  • ह्याचे भाषांतर "शिक्षण" असे देखील केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पाहा: शिकवणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3948, H4148, H8052, G1319, G1322, G2085