mr_tw/bible/other/desolate.md

3.9 KiB

ओसाड, भकास, नाश

व्याख्या:

"ओसाड" आणि "नाश" या शब्दांचा संदर्भ वस्ती असलेल्या प्रांताचा नाश करणे, जेणेकरून तो प्रांत निर्मनुष्य बनेल.

  • जेंव्हा एखाद्या मनुष्याला संदर्भित केले जाते, तेंव्हा "ओसाड" हा शब्द विध्वंस, एकाकीपणा आणि दुःखाचे वर्णन करतो.
  • "भकास" हा शब्द ओसाड झाल्याच्या स्थितीचे किंवा परिस्थितीचे वर्णन करतो.
  • जर एखादे क्षेत्र जिथे पिके वाढत असताना त्याला ओसाड केले, त्याचा अर्थ एखाद्या गोष्टीने पिकांचा नाश केला, जसे की कीटक किंवा आक्रमण करणारे सैन्य.
  • एक "ओसाड प्रांत" ह्याचा संदर्भ जागेच्या क्षेत्राशी आहे, जिथे खूप कमी लोक राहतात, तिथे पिकांची किंवा वनस्पतींची वाढ खूप कमी होते.
  • एक "ओसाड भूमी" किंवा "वाळवंट" हा असा भाग होता, जिथे सहसा बहिष्कृत केलेले लोक (जसे की, कुष्टरोगी) आणि धोकादायक प्राणी राहत असत.
  • जर एखाद्या शहराला "ओसाड बनवले" तर ह्याचा अर्थ त्याच्या इमारतींचा आणि वस्तूंचा नाश केला किंवा चोरून नेल्या आणि त्याच्या लोकांना मारून टाकले किंवा बंदी करून घेऊन गेले, असा होतो. ते शहर "रिक्त" आणि "नष्ट केलेले" असे बनते. हे "नासधूस करणे" किंवा "उध्वस्त करणे" या शब्दांच्या अर्थाच्या समान अर्थाचे आहे, पण ह्याचा भर रिक्तपणावर अधिक आहे.
  • संदर्भाच्या आधारावर, या शब्दाचे भाषांतर "नष्ट करणे" किंवा "नाश केलेले" किंवा "निरुपयोगी कचरा" किंवा "एकाकी" किंवा "बहिष्कृत" किंवा "निर्जन" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: वाळवंट, नासधूस करणे, नष्ट करणे, कचरा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H490, H816, H820, H910, H1327, H1565, H2717, H2720, H2721, H2723, H3173, H3341, H3456, H3582, H4875, H4876, H4923, H5352, H5800, H7582, H7612, H7701, H7722, H8047, H8074, H8076, H8077, G2048, G2049, G2050, G3443