mr_tw/bible/other/courage.md

6.3 KiB

धैर्य, शूर (खंबीर), प्रोत्साहन, बोध, धीर धरणे, धैर्यहीन, परावृत्त, निरुत्साही

तथ्य:

"धैर्य" या शब्दाचा अर्थ कठीण, भयावह किंवा धोकादायक अशा काही गोष्टींचा सामना करणे किंवा त्या गोष्टी करणे असा होतो.

  • "धैर्यवान" हा शब्द जो धैर्य दाखवतो त्याचे वर्णन करतो, जो भीती वाटत असताना किंवा हार मानण्याचा दबाव येत असतो तेव्हाही योग्य गोष्टी करतो.
  • एखादी व्यक्ती ताकद आणि चिकाटीने भावनिक किंवा शारीरिक दुखापत झाल्यास धैर्य दाखवते.
  • "खंबीर हो" या अभिव्यक्तीचा अर्थ "घाबरू नका" किंवा "खात्री बाळगा की गोष्टी चांगल्या प्रकारे वळतील" असा होतो.
  • जेंव्हा यहोशवा कनानच्या भयानक देशात जाण्याची तयारी करत होता, तेंव्हा त्याला मोशेने त्याला "खंबीर हो आणि हिम्मत धर" असे प्रोत्साहित केले.
  • "धैर्यवान" या शब्दाचे भाषांतर "शूर" किंवा "न घाबरणारा" किंवा "धाडसी" असेही केले जाऊ शकते.
  • संदर्भावर आधारित, "धैर्य धर" या शब्दाचे भाषांतर "भावनिकदृष्ट्या कणखर व्हा" किंवा "विश्वास ठेवा" किंवा "खंबीर उभे राहा" असे देखील केले जाऊ शकते.
  • "धैर्याने बोलणे" ह्याचे भाषांतर "धाडसाने बोलणे" किंवा "भिती न बाळगता बोलणे" किंवा "आत्मविश्वासाने सांगणे" असे होऊ शकते.

"प्रोत्साहन" आणि "बोध" या शब्दांचा संदर्भ, एखाद्याला सांत्वन, आशा, आत्मविश्वास, आणि धैर्य मिळवण्याकरिता काही गोष्टी सांगणे किंवा करण्याशी आहे.

  • अशीच एक संज्ञा "प्रोत्साहनात्मक" आहे, ज्याचा अर्थ एखाद्याला चुकीच्या कृतीचा त्याग करण्यास आणि त्याऐवजी जे चांगले आणि बरोबर आहेत त्या गोष्टींना करण्यास उद्युक्त करणे असा होतो.
  • प्रेषित पौल आणि नवीन कराराच्या इतर लेखकांनी, ख्रिस्ती लोकांना एकमेकांना प्रेम करण्यासाठी आणि सेवा करण्यासाठी प्रोत्साहित करण्यास शिकवले.

"परावृत्त" या शब्दाचा अर्थ लोकांना आशा, आत्मविश्वास व धैर्य गमावण्यास कारणीभूत होणे, जेणेकरून त्यांना जे करायला हवे आहे ते करण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची इच्छा कमी करणे असा होतो.

भाषांतर सूचना

  • संदर्भावर आधारित, "प्रोत्साहन" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "आग्रह" किंवा "आराम" किंवा "दयाळू गोष्टी सांगणे" किंवा मदत आणि समर्थन करणे" ह्यांचा समावेश होतो.
  • "बोध देणारे शब्द द्या" या वाक्यांशाचा अर्थ म्हणजे "अशा गोष्टी बोला, ज्याने इतर लोकांना असे वाटेल की, त्यांना प्रेम केले, स्वीकारले, आणि अधिकार दिला.

(हे सुद्धा पहा: विश्वास, प्रोत्साहने, भीती, ताकद)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H533, H553, H1368, H2388, H2388, H2428, H3820, H3824, H7307, G2114, G2115, G2174, G2292, G2293, G2294, G3870, G3874, G3954, G4389, G4837, G5111