mr_tw/bible/other/confidence.md

4.1 KiB

विश्वास, भरवसा, धैर्याने

व्याख्या:

"विश्वास" या शब्दाचा संदर्भ एखादी गोष्ट खरी असण्याची किंवा असेच घडणार असण्याची खात्री असणे ह्याच्या संबंधात आहे.

  • पवित्र शास्त्रामध्ये, "आशा" या शब्दाचा सहसा अर्थ, एखादी गोष्ट खात्रीने घडणार आहे, या अपेक्षेने वाट बघणे असा होतो. विशेषकरून, ज्याचे देवाने येशुमधील विश्वासनाऱ्यांना अभिवचन दिले आहे, ते खात्रीने मिळणार ह्याच्या अर्थाचे, ULB भाषांतरण सहसा ह्याचे भाषांतर "विश्वास किंवा "भविष्याबद्दलचा भरवसा" किंवा "भविष्यातील विश्वास" असे करते.
  • बऱ्याचदा "विश्वास" या शब्दाचा संदर्भ, विशेषकरून येशुमधील विश्वासणारे एके दिवशी सदासर्वकाळासाठी देवाबरोबर स्वर्गामध्ये असतील, ह्याची खात्री असण्याच्या संबंधात येतो.
  • "देवावर विश्वास ठेवा" या वाक्यांशाचा अर्थ ज्याचे देवाने अभिवचन दिले आहे, ते पूर्णपणे मिळण्याची अपेक्षा बाळगणे असा होतो.
  • "भरवसा" असणे ह्याचा अर्थ देवाच्या वचनांवर विश्वास ठेवणे आणि देवाने जे सांगितले आहे ते देव करीलच या खात्रीने वागणे असा होतो. या पदांना धैर्याने आणि धाडसाने कार्य करण्याच्या शब्दाचा अर्थ असू शकतो.

भाषांतर सूचना

  • "भरवसा" या शब्दाचे भाषांतर "खत्रीने" किंवा "अगदी नक्की" असे होऊ शकते.
  • "भरवसा ठेव" या वाक्यांशाचे भाषांतर "पूर्णपणे विश्वास ठेवणे" किंवा "च्या बद्दल पूर्ण खात्री बाळगणे" किंवा "निश्चितपणे माहित असणे" असे देखील होऊ शकते.
  • "धैर्याने" या शब्दाचे भाषांतर "धाडसाने" किंवा "निश्चीततेसह" असेही केले जाऊ शकते.
  • संदर्भाच्या आधारावर, "विश्वास" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "पूर्ण खात्री" किंवा "निश्चित अपेक्षा" किंवा "निश्चितपणे" ह्यांचा समावेश होतो.

(हे सुद्धा पहा: विश्वास, धाडस, विश्वासू, अशा, विश्वास)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

{{topic>confidence&nocomments}}

Strong's

  • Strong's: H982, H983, H985, H986, H3689, H3690, H4009, G1340, G2292, G3954, G3982, G4006, G5287